शरद पवारांच्या पक्षाला मिळालं ‘हे’ नाव; निवडणूक आयोगाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाने आज दुपारपर्यंत आपल्या पक्षासाठी नव्या नावाचा प्रस्ताव पाठवावा असे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार शरद पवार गटांकडून तीन महत्त्वाची नावे पाठवण्यात आली होती. त्यातील एका नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे.

पक्षाचे नवीन नाव कोणते?

आज निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे नवीन नाव दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांचा गट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाने ओळखला जाणार आहे. गेल्या काही वेळापूर्वीच निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटासाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव सुचवण्यात आले आहे. आता या नावाला घेऊन शरद पवार यांचा गट सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून आज निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या नावांमधील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस अशा तीन प्रमुख नावांचा समावेश होता. यातील दोन नावे वगळून आयोगाने शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव दिले आहे. आता लवकरच शरद पवार गटाला आयोगाकडून नवे चिन्ह देखील देण्यात येईल.