हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही कधी प्रायव्हेट जेटने प्रवास केला आहे का? किंवा प्रायव्हेट जेट कशा पद्धतीच्या असतात हे तरी माहित आहे का? नसेल माहित तर आज आम्ही तुम्हाला अशा प्रायव्हेट जेटची माहिती देणार आहोत जे जगातील सगळ्यात सुंदर आणि मोठे प्रायव्हेट जेट आहे. या प्रायव्हेट जेट चे नाव आहे ‘फ्लाइंग मेंशन’. या जेटमध्ये बेडरूम, डायनिंग रूम, मास्टर सूट अशा सर्व पद्धतीच्या गोष्टी उपलब्ध आहेत.
फ्लाइंग मेंशन रूम्स
फ्लाइंग मेंशन या प्रायव्हेट जेटमध्ये लोकांच्या प्रायव्हसीची सर्वात जास्त काळजी घेतली जाते. प्रायव्हेट जेट मध्ये असलेल्या रूम्स कॉकपिटच्या एकदम जवळ आहेत. मात्र तरीदेखील आतमध्ये इंजिनचा आवाज येत नाही. या जेटमध्ये असणाऱ्या रूम्सला देखील खूप अनोख्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. या प्रायव्हेट जेटमध्ये बरीच मोठी जागा आहे. ज्यामध्ये आपण सहज आपल्याला हवे त्या प्रमाणात साहित्य ठेवू शकतो. खास म्हणजे, जेटच्या इंटेरिअरचा कलरही असा देण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला एखाद्या महालात आल्यासारखे वाटेल. तसेच आत मध्ये जे काही फर्निचर ठेवण्यात आले आहे ते सर्व लाकडी आहे. खास म्हणजे, या प्रायव्हेट जेटला ज्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे त्यावरून आपल्याला एका लक्झरी जेट मध्ये असल्यासारखे वाटते.
कोणाच्या मालकीचे जेट आहे?
सर्वांचे डोळे चक्राहून जातील असे आलिशान फ्लाइंग मेंशन रिअल इस्टेट टायकून जोसेफ लाऊकडे आहे. त्यांची एकूण संपत्ती 10.3 बिलियन पाऊंडपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या जेटमध्ये देखील सर्व लक्झरी सुविधा पुरविण्यात आले आहेत. या जेटमध्ये एकाच वेळी 467 प्रवासी प्रवास करू शकतात. या सर्व प्रवाशांना आत मध्ये जेवणाच्या सोयीसोबत ड्रिंक्स आणि गेम्सची ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या जेट ची किंमत देखील 426 मिलियनपेक्षा जास्त आहे.