बँक ऑफ बडोदाचा हा शेअर 240 रुपयापर्यंत जाणार; मिळणार आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ बडोदाचा शेअर हा गेल्या काही महिन्यांत कासवाच्या चालीने चालत आपल्या आजवरच्या सर्वोच्च किंमतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. गेल्या वर्षभरात शेअरने घेतलेली झेप हि खरच कौतुकास्पद आहे. ह्या वर्षीच्या जानेवारी -मार्च 23 या तिमाहीत बँकेने 4775 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाच्या यंदाच्या तिमाही नफ्यात 168% वाढ झाली आहे. या तिमाही निकालानंतर बँक ऑफ बडोदाचे शेअर तेजीच्या रोखीने वाढत आहे . शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आज रोजी 17/05/2023 186 /- रुपयांवर येऊन स्थिरावलेला भविष्यात 240/- रुपयांपर्यंत मजल मारू शकतो.

buy rating with 240/- price target –

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने बँक ऑफ बडोदाचे शेअर हे 240 /- रुपयांपर्यंत धावणार असल्याचे सांगितले आहे. बँक ऑफ बडोदाचे गेल्या महिन्यातील तिमाहीचे निकाल खूपच उत्तम आले आहेत. शिवाय बँकेचे मार्जिन 3.53% पर्यंत वाढले आहे. व्यवसायातही 5.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Overweight Stock Rating 230/-

ग्लोबल ब्रोकिंग आणि रिसर्च फर्म जेपी मॉर्गनने बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवली आहे आणि बँकेचे शेअर 230/- रुपयांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्या मते गेल्या तिमाहीत बँकेचा नफा दुपटीने वाढला असून बँकेचे शेअर 230/- रुपयांपर्यंत नक्कीच मजल मारतील.

buy rating with 220/- price target

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने बँक ऑफ बडोदाचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि स्टॉकची किंमत 220 /- रुपयांपर्यंत जाईल असं अंदाज नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने नोंदवला आहे.