मुंबई-पुणे प्रवाशांनो ऐका!! येत्या 28 ते 30 जूनदरम्यान या महत्वाच्या ट्रेन रद्द राहणार

Mumbai Pune Trains
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे बातमी आली आहे. येत्या 28 ते 30 जून दरम्यान मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. ज्यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही ट्रेन दुहेरीकरणाच्या कामामुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेच येत्या 28 ते 30 जून दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, 28 जून रोजी पुणे- मुंबई इंटरसिटी ट्रेन रद्द असेल. 29 जून रोजी मुंबई- पुणे डेक्कन ट्रेन तर 30 जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी ट्रेन रद्द असणार आहे.

दरम्यान, रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या दुहेरीकरणामुळे इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवस रद्द राहिल्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. या दोन्ही ट्रेन खूप कमी वेळेमध्ये प्रवाशांना पोहचवत असते. यामुळे नोकरीला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचतो. परंतु आता या ट्रेन तीन दिवस बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांना दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे.