नवरात्रीत 30 वर्षांनंतर घडणार हा अद्भुत योग; 4 राशींना होईल धनप्राप्ती, देवीची राहील विशेष कृपा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी येत्या 15 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 9 दिवसानंतर म्हणजेच 23 ऑक्टोंबर रोजी नवरात्री उत्सव संपणार आहे. मुख्य म्हणजे, नवरात्रीच्या सुरुवातच तब्बल 30 वर्षांनंतर घडून येणाऱ्या दुर्मिळ योगाने होणार आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात, अशा वेळेत होईल जेव्हा सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत एकत्र येतील. ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल. या काळात 4 विशेष राशींवर माता दुर्गेची कृपा राहणार राहील. 30 वर्षानंतर घडून येणार्या या योगामुळे, शनी स्वतःच्या राशीत राहील, बुध स्वतःच्या राशीत असेल. भद्र योग तयार करेल. ज्यामुळे 4 राशींसाठी हा योग अत्यंत शुभ मानला जाईल.

मेष

नवरात्रीच्या काळात मेष राशीतील लोकांना सुखप्राप्ती होईल. या राशीच्या लोकांना देवी दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनांचे अधिक सुख मिळेल. या काळात मेष राशीतील लोकांना नोकरीची सुवर्णसंधी चालून येईल. तसेच व्यवसायात देखील आर्थिक फायदा मिळेल. या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळेच मेष राजेच्या लोकांसाठी बुधादित्य योग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

वृषभ

वृषभ राशीतील लोकांना नवरात्रीच्या काळात धनप्राप्ती होईल. माता देवीच्या कृपेने आयुष्यात आनंद समाधान शांती निर्माण होईल. तसेच करिअरमध्ये देखील प्रगती होईल. या राशीतील लोकांना यशाचे मार्ग सापडतील. तसेच यामुळे कुटुंबातील वातावरण देखील प्रसन्न आणि आनंदी राहील. वृषभ राशीतील लोकांसाठी नवरात्रीचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

कर्क

नवरात्रीच्या काळात बुधादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे कर्क लोकांवर माता दुर्गेची विशेष कृपा बनवून राहील. या राशीतील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तसेच समाजात मान प्रतिष्ठा वाढेल असे काम हातून घडेल. तसेच मित्रांच्या सहकार्यामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच या काळात कर्क राशीतील लोकांना परदेशात जाण्याची संधी चालून येऊ शकते.

तूळ

तूळ राशीतील लोकांना या काळात अनेक चांगल्या बातम्या मिळतील. तसेच तूळ राशीतील लोकांनी नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्यास तिच्या कृपेमुळे मनाशी बाळगून ठेवलेली इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर आजारी लोकांची तब्येत या काळात सुधारित. तूळ राशीतील लोकांना या काळात धनप्राप्ती होण्याचे देखील शक्यता आहे.