यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ ११ डिसेंबर पासून; पाच दिवस असणार कार्यक्रम 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या  ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा ११ ते १५  डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्र क्रीडा संकुल येथे होणार आहे. या महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष आहे.  दरवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवात दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहे.

 या महोत्सवाची सुरवात जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने  तर समारोप परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.

यामध्ये ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर, अनुजा बोरुडे, केन झुकरमन यांचे सरोदवादन, ओंकारनाथ हवालदार ,  पं. जसराज, व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम,  ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे – देशपांडे , अतुल खांडेकर यांचे सादरीकरण या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे.

कार्यक्रम वेळ  पुढीलप्रमाणे – 

११ डिसेंबर ते १३ डिसेंबर –  दुपारी ०४ ते रात्री १०

१४ डिसेंबर – दुपारी ०४ ते रात्री १२

१५ डिसेंबर – दुपारी १२ ते रात्री १०

Leave a Comment