रस्ते अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना मिळणार तब्बल एवढे रुपये; केंद्र सरकारची योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेकवेळा रस्ते अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. परंतु अशी काही ठराविक माणसे असतात जी माणुसकी दाखवत जखमींना तातडीने मदत करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत मदतीचा हात देणाऱ्यांना केंद्र सरकारकडून समरीटन योजनेंतर्गत 15 हजार रुपये ते 1 एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.

सध्या केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर तत्परतेने रुग्णालयात नेणार्‍यांना 5 हजार रुपये देत आहे. परंतु आता या रकमेत वाढ करत ती 15 हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच, एका वर्षातील 10 साहाय्यकांना 1 लाख रुपये देणार आहे. रस्ते अपघातात साहाय्य करणार्‍यांची संख्या वाढवण्यासाठी सरकार हा मानधन देण्याचा उपक्रम राबविणार आहे. यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये 3 जणांचा गट बनवण्यात येईल. हा गट सर्वप्रथम साहाय्यासाठी जाईल.

दरम्यान, एका वर्षातील 10 साहाय्यकांना ही मानधन रक्कम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय राज्यांच्या परिवहन विभागांकडून देण्यात येईल. केंद्र सरकारकडून समरीटन ही योजना गेल्या अनेक काळापासून चालवली जात आहे. परंतू यापूर्वी योजनेअंतर्गत सहाय्यकांना फक्त 5 हजार रुपये देण्यात येत होते. परंतु आता या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.