हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thoseghar Waterfall । सध्या सर्वत्र रिमझिम पाऊस बरसत असून पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या वातावरण मनसोक्त आनंद घ्यावा आणि निसर्गाच्या कुशीत एकजीव व्हावं असं प्रत्येकालाच वाटत. त्यानुसार, हिल स्टेशन, धबधबे याना पर्यटकांकडून भेटी दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात अनेक धबधबे आहेत ज्यांचं सौंदर्य पावसाळ्यात आणखी खुलते. परतुं, तुम्हला महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा माहितेय का? सातारा जिल्ह्यात सर्वात उंच धबधबा आहे ज्याला ठोसेघर धबधबा असं म्हंटल जाते. या धबधबा म्हणजे निसर्गाचा एक मोठा अविष्कारच म्हणावा लागेल.
कुठे आहे ठोसेघर धबधबा ? Thoseghar Waterfall
ठोसेघर धबधबा (Thoseghar Waterfall) सातारा शहरापासून सुमारे 20-26 किमी अंतरावर, ठोसेघर गावाजवळ, सह्याद्रीच्या पश्चिम घाटात वसलेला आहे. हा धबधबा कोयना खोऱ्याच्या जवळ आहे, जो जैवविविधतेने समृद्ध आहे. हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो, ज्यापैकी सर्वात उंच टप्पा सुमारे २०० मीटर उंचीवरून कोसळतो. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा धबधबा विशेषतः पावसाळ्यात (जून-जुलै) पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतो. देशातील हा दुसरा सर्वात उंच धबधबा आहे तर महाराष्ट्रातील नंबर १ .. हा धबधबा सह्याद्रीच्या सौंदर्यात भर घालतो. आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने झाकलेली खोरे आणि पाण्याचा खळखळाट यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे आहे. ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गॅलरी बांधण्यात आली आहे. तसेच जाळ्या देखील लावण्यात आल्या आहेत.
ठोसेघरला कस जायचं?
तुम्ही पाचगणीहून येत असाल तर या धबधब्याचे अंतर 73 किमी आहे. महाबळेश्वरपासून या धबधब्याचे अंतर 77 किमी आहे. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी 141 किमीचा प्रवास करावा लागेल. मुंबईपासून ठोसेघर धबधब्याचे अंतर 294 किमी आहे. सातारा शहरातून ठोसेघरला जाण्यासाठी रस्ते सुधारले आहेत. सातारा-ठोसेघर रस्ता हा डोंगराळ आणि वळणावळणाचा आहे. हा रास्ता सज्जनगड मार्गे जातो. खाजगी वाहने, टॅक्सी किंवा स्थानिक बस यांचा वापर करता येतो. ठोसेघर येथे पर्यटकांसाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, जसे की पार्किंग, छोटे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि पायवाटा. मात्र, येथे हॉटेल्स किंवा मोठ्या रिसॉर्ट्सची सुविधा नाही, त्यामुळे सातारा किंवा जवळच्या गावांमध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागते.
महत्वाची बाब, पावसाळ्यात धबधब्याच्या जवळ जाणे धोकादायक असू शकते, कारण खड्डे आणि पाण्याचा प्रवाह अप्रत्याशित असतो. स्थानिक सूचनांचे पालन करा.. सध्या सातारा प्रशासनाने जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळांवर निर्बंध लावले आहेत. त्यात ठोसेघर धबधबा (Thoseghar Waterfall) सुद्धा आहे. त्यामुळे नियमांचे पालन करूनच पर्यटन करावे लागेल.




