Thoseghar Waterfall : काय तो नजारा, अहाहा!! साताऱ्यातील ‘हा’ धबधबा करतो निसर्गाशी गुजगोष्टी; तुम्ही पाहिलाय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Thoseghar Waterfall) पावसाळा सुरु झाला की, आपोआपच मनाला एक वेगळा दिलासा मिळतो. कडक उन्हानंतर अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी एक वेगळाच आनंद घेऊन येतात आणि आपल्याला ताजेतवाने करून जातात. रोजरोजच्या कामातून एखादी सुट्टी काढून अशा वातावरणात फिरायला जावे प्रत्येकाला वाटते. पण शहरात अशी शांतता आणि असा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी एका सुंदर ठिकाणाची माहिती देणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहू शकाल. ज्याच्या तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे निसर्गशोभा वाढवत असतात. आज आपण ज्या ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत, ते ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा. या धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य इतके अलौकिक आहे की, पाहणारा प्रेमातच पडेल. (Thoseghar Waterfall) त्यात पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य आणखीच खुलून येते आणि आजूबाजूचा परिसर.. त्याबद्दल तर बोलू तितके कमीच. चला तर या सुंदर ठिकाणाविषयी अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे? (Thoseghar Waterfall)

ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

पार्किंग आणि प्रवेश शुल्क किती आहे?

ठोसेघर धबधब्याजवळ तुमच्या चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. ज्यासाठी तुम्हाला ३० रुपये मोजावे लागतात. तर दुचाकीसाठी पार्किंग विनामूल्य आहे. तसेच हा धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला प्रवेश शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतात. गेटमधून आत जाताच धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा एक नकाशा दिसतो. (Thoseghar Waterfall) तो पाहून तुम्ही आसपासचा परिसर फिरू शकता. तसेच प्रवेशावेळी या ठिकाणी बरेच फेरीवाले आणि रेस्टॉरंट दिसतात. जिथे तुम्ही अल्पोपहार घेऊ शकता.