योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; एका फोन कॉलमुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सुरक्षितेत आणखीन वाढ करण्यात आली आहे. तसेच, रविवारी याप्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवालीमधील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या व्यक्तीचा फोन देखील ट्रेस केला जात आहे.

फोनद्वारे देण्यात आली धमकी..

समोर आलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सीयूजी नंबरवरून हा धमकीचा फोन केला होता. हा फोन हेड कॉन्स्टेबलने घेतला होता. याच फोनवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलने तुम्ही कोण बोलत आहात? कुठून बोलत आहात? असे प्रश्न विचारले मात्र कॉल डिस्कनेक्ट करण्यात आला. याची माहिती कॉन्स्टेबलने त्वरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला.

मुख्य म्हणजे, हेड कॉन्स्टेबलने केलेल्या तक्रारीच्या आधारावरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस यंत्रणा सर्व प्रकरणाचा तपास करीत आहे. तर, योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी चार पदके तैनात केली आहेत. तसेच त्याचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, कॉन्स्टेबलने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा फोन रात्री साडेदहाच्या सुमारास आला होता. या फोनवरूनच योग्य आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वी देखील आदित्यनाथ यांना असे धमकीचे फोन आल्यामुळे हे प्रकरण गंभीरपणे हाताळले जात आहे.