नांदेडच्या करडई उत्पादकांना तीन पुरस्कार

नांदेड : राज्यपातळीवरील हंगाम पीक स्पर्धेत (2020) नांदेड जिल्ह्यातील करडई उत्पादकांनी सर्वसाधारण गटात प्रथम, द्वितीय व तृतीय असे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन व उत्पादकता वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के व देगलुर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले.

राज्यपातळीवरील रब्बी हंगाम पीक 2020 मध्ये सर्वसाधारण गटातून शेतकऱ्यांना सहभाग घ्यायला लावला. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि देगलुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली. कृषी विभागाच्या वतीने लवकरच पुरस्कार वितरण आहे .

पुरस्कार विजेते :

प्रथम – आलुर (ता. देगलूर) येथील राजेश हनुमंतराव हळदे (हेक्टरी 34 क्विंटल 72 किलो करडई उत्पादन) . द्वितीय – सुनील नामदेव चिमनपाडे (रा .कुडली ता. देगलूर, हेक्टरी 27 क्विंटल 79 किलो उत्पादन). तृतीय – आलूर (ता देगलूर) येथील प्रतापरेड्डी देवन्ना चिंतलवार (हेक्टरी 20 क्विंटल 56 किलो करडई उत्पादन)