घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
वाई तालुक्यातील धोम कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांकडून 21 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पंकज आनंदराव राजपुरे (वय- 28, रा. साक्षी विहार, यशवंत नगर वाई), विलास बबन कोळी (वय- 19 रा. रेल्वे स्टेशनजवळ कोरेगाव) व रवी रमेश काळे (वय- 38, रा, बावधन नाका, वाई) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.

संशयितांनी शुक्रवारी (ता. 30) रात्री धोम कॉलनी येथील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 21 हजार रुपये किमतीचे पाण्याचे नळ व एसी चोरून नेला असल्याची तक्रार डॉ. कासुर्डे यांनी दाखल केली होती. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी विभागाने करून चोरट्यांना बावधन नाका येथून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, अमित गोळे, श्रावण राठोड, प्रसाद ददुस्कर यांनी केली.