‘थ्री ईडीयट्स’ स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई – बाळ दोघेही ओक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थ्री ईडीयट्स चित्रपटातील दृश्यांसारखीच यशस्वीपणे व्हॅक्युम प्रसूती केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तब्बल 17 डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही प्रसूती यशस्वी झाली. आई आणि बाळ दिघेही ठणठणीत आहेत. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. त्यांचा पाठीचा मणका वाकडा असल्यानं नॉर्मल डिलिव्हरी शक्य नव्हती. याशिवाय बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे सिजर करणेही अवघड झाले होते.

याशिवाय भूल देण्यानेही गर्भवतीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे प्रसूती करण्याबाबत चिंतेचे वातावरण पसरलं होतं.अखेर 17 तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूम पद्धतीने प्रसूती पार पाडली. डॉक्टरांना या सर्व प्रक्रियेसाठी 2 तास लागले. अखेर या प्रसूती नंतर महिलेसह नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे.