पोलिसांनी आवळल्या तीन फटफटी गँग सदस्यांच्या मुसक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : नाथ मंदिर परिसरातील मोक्ष घाट समोरील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन फटफटी गँग सदस्यांच्या मुसक्या आवळल्याअसून पाच मोटासायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आठ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोक्ष घाट येथे सुरू असलेल्या परिसराची पाहणी केली होती. महसूल व पोलिसांना संबंधित वाळू तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या घटनेला आठवडा उलटला नाही तोच पुन्हा फटफटी गँगने डोकेवर काढले आहे. नाथ मंदिर परिसरात असलेल्या मोक्ष घाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून मोटर सायकल फटफटी गँग मार्फत पुन्हा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळताच त्यांनी मॉर्निंग वाकचा पेहराव धारण करून ते त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गोदावरी नदीच्या पात्रात उतरले असता याठिकाणी फटफटी गॅंगवाले वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे लक्षात येताच वाळूतस्करांची धांदल उडाली. अवैध वाळू उपसा करणारे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळत सुटले. काहीजण फटफट्या जागेवर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना ताब्यात घेतले. इतर काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. या तीन तरुणांना व पाच फटफट्या पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणले. या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पर्यंत सुरू होती.पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे फटफटी गँगचे धाबे दणाणले आहे.

Leave a Comment