हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी टू व्हीलर उत्पादक कंपनी Yamaha ने तिची प्रसिद्ध तीन-चाकी स्कूटर Yamaha Tricity रेंज अपडेट करून लॉन्च केली आहे. ट्रायसिटी 125 आणि ट्रायसिटी 155 असं या स्कुटरच नाव आहे. या स्कुटरच्या पुढच्या बाजूला दोन चाके आणि मागच्या बाजूला एक चाक आहे. आज आपण जाणून घेऊया या युनिक स्कुटरची खास वैशिष्ट्ये….
डिझाईन –
दोन्ही स्कूटरचे डिझाइन एकसारखेच आहे. गाडीच्या मध्यभागी एलईडी हेडलाइट, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलसीडी सेंटर कन्सोल मिळते. यामध्ये सिंगल सीट सह इंटिग्रेटेड ग्रैब रेल मिळते जे पाठीमागे बसलेल्या प्रवाशासाठी खूप उपयुक्त ठरते. कंपनीने नवीन अपडेटनंतर स्कूटरच्या डिझाइनमध्ये स्पोर्टी फील देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इंजिन –
दोन्ही स्कुटरच्या इंजिन बाबत सांगायचं झाल्यास, ट्रिसिटी 125 मध्ये, कंपनीने पूर्वीप्रमाणेच 125cc सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन वापरले आहे जे 12.06bhp पॉवर आणि 11.2Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, ट्रिसिटी 155 मध्ये, कंपनीने 155cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे, जे 14.88bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करते.
समोर 2 चाके असल्याने स्कुटरचा लुक वेगळाच दिसतोय. मात्र कंपनीने पुढचे चाक सहजतेने झुकता येण्याजोगे ठेवले आहे. ज्यामुळे टर्न मारताना कोणतीही अडचण येत नाही. दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, पुढच्या भागात टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ऑब्झर्व्हर सस्पेंशन देण्यात आले आहे.
किंमत किती ?
गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, जपानी बाजारपेठेत Tricity 125 ची सुरुवातीची किंमत 4,95,000 येन आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे 3.10 लाख रुपये असेल. तर ट्रिसिटी 155 ची किंमत 5,56,500 येन (सुमारे 3.54 लाख रुपये) आहे. सध्यातरी या दोन्ही स्कूटर्स फक्त जपानी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत. भारतात अशा प्रकारच्या तीन चाकांच्या स्कुटर खरेदी करता येतील का हे आत्ताच सांगता येत नाही.