टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पुण्यामध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके ?
आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात (accident) झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. टोमॅटो घेऊन हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या 32 व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून हा अपघात (accident) घडला. यामध्ये रावणगाव परिसरातील बंगाल वस्तीवरील नऊ महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला तर बाकी गंभीर जखमी आहेत.

सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसो पानसरे,अश्विनी प्रमोद आटोळे असे या अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत. तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे, मीना बापू आटोळे,अनिता धनाजी साळुंखे, आक्का सुदाम साके, कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या महिला या अपघातात (accident) गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्व महिला एकाच वस्तीवरील असल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!