पाण्याची टाकी साफ करण्याची पारंपारिक पण प्रभावी पद्धत ; ‘या’ लाकडाचा करा वापर

water tank cleaning
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपल्या प्रत्येकाच्या घरात पाण्याच्या टाक्या असतीलच. पण पाण्याच्या टाक्या वेळेत साफ करणे गरजेचे असते. मात्र हे काम अतिशय कटकटीचे आणि वेळखाऊ आहे. पण कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही तुमच्या घरातील टाकी सहज साफ करू शकता. टाकी साफ करण्याची ही पद्धतही खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त एका गोष्टींची गरज आहे. जाणून घेऊया काय आहे ही पद्धत…

जांभूळाचे लाकूड हे घरातील टाकी स्वच्छ करण्याचा भारताचा पारंपारिक आणि नैसर्गिक मार्ग आहे. टाकी स्वच्छ करण्यासाठी जांभूळ लाकडाचा वापर केला जातो. शतकानुशतके या लाकडाचा वापर पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी केला जातो.

खरेतर , जांभूळ लाकडात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो म्हणून जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत. अँटीव्हायरल म्हणजे जे विषाणू काढून टाकण्यास मदत करते आणि अँटीफंगल म्हणजे बुरशीचे उच्चाटन करण्यास मदत करते.मात्र पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्हाला या लाकडाचा वापर कसा करायचा ? हे माहित असणे आवश्यक आहे.

या लाकडाचा वापर करून पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. याशिवाय जामुन लाकडाचा वापर वॉटर फिल्टरमध्येही करता येतो. चला हि ट्रिक कशी वापरायची ? जाणून घेऊया…

  • जांभूळा लाकडाचा तुकडा पाण्याच्या टाकीत टाका.
  • लाकूड टाकीमध्ये 2-3 दिवस ठेवा.
  • यानंतर टाकी रिकामी करा आणि पाण्याने धुवा.
  • टाकी वाळवा आणि पुन्हा नवीन पाण्याने भरा.

घराची टाकी कधी साफ करावी?

दर 6-12 महिन्यांनी नियमितपणे टाकी स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही केमिकल्सने टाकी स्वच्छ कराल तेव्हा ती रिकामी करा. टाकीमध्ये केमिकल टाका आणि 2-3 तास सोडा. यानंतर, टाकी धुवा आणि टाकी कोरडी करा.