IRCTC सोबत करा ‘श्रीरामायण यात्रा’ ; श्रीलंकेतील ठिकाणे पाहण्याची संधी, पहा किती येईल खर्च ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जर तुम्हीच यंदाच्या नाताळाच्या सुट्टीत आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. IRCTC ने परदेशात जाण्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज लाँच केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला श्रीलंकेच्या कँडी, नुवारा एलिया आणि कोलंबोला भेट देण्याची संधी मिळेल. चला तर मग जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे ‘श्री रामायण यात्रा’. या पॅकेजमध्ये तुमची राहण्याची, जेवणाची आणि प्रवासाचीही व्यवस्था असेल. ही पूर्ण ट्रिप पाच रात्री आणि सहा दिवसांची असेल. या ट्रिप ची सुरुवात दिल्ली पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात असाल आणि तुम्हाला या ट्रीपला जायचं असेल तर आधी दिल्लीमध्ये पोहोचावे लागेल.

कुठे कुठे फिराल?

या पॅकेजच्या अंतर्गत तुम्हाला श्रीलंका मधील कॅन्डी, नुवारा एलिया आणि कोलंबो या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

किती येईल खर्च?

जर तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल आणि बुकिंग करत असाल तर तुम्हाला 85 हजार रुपये मोजावे लागतील. दोघांकरिता 69 हजार रुपये आणि तिघांकरिता 67 हजार रुपये प्रति व्यक्ती खर्च येणार आहे. जर तुमच्या सोबत कोणी पाच ते अकरा वर्षांचे मुल असेल तर त्यासाठी 57 हजार रुपये आकारले जातील. पाच ते अकरा वर्षांच्या मुलासाठी बेड घेणार नसाल तर त्यासाठी 55 हजार 950 रुपये लागतील. तर या ट्रिपमध्ये दोन ते अकरा वर्षाच्या मुलासाठी 55 हजार रुपये द्यावे लागतील.

कधीपासून सुरुवात

जर तुम्हाला या पॅकेज अंतर्गत प्रवास करायचा असेल तर लक्षात घ्या की या पॅकेज ची सुरुवात 14 डिसेंबर पासून होत आहे.

संपर्क

8287930747
8287930624
8287930718
9717641764