Tips For Lightning : पावसाळा सुरु झाला की वीज पुरवठा खंडित होणं काही नवीन नाही. अशा वेळी अनेकजण मोबाईलचा टॉर्च, मेणबत्ती किंवा लॅम्पचा वापर करतात. मग प्रतेय्क खोलीत एक मेणबत्ती किंवा बॅटरीची सोया करावी लागते. विशेष म्हणजे पावसाळ्यात लाईट जाण्याचे प्रमाण देखील अधिक असते. मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला एक भन्नाट देशी जुगाड सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या खोलीभर प्रकाश पडणार आहे.
अलीकडे एक देसी जुगाड व्हायरल झाला आहे, जो फक्त एका पाण्याच्या बाटलीने संपूर्ण खोली ट्यूबलाइटसारखी उजळवतो. तेही वीज न वापरता! हा जुगाड एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आला आहे, ज्यामध्ये @chanda_and_family_vlogs या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पारदर्शक प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरते आणि ती बाटली मोबाईलच्या टॉर्चवर ठेवते. काही क्षणातच ती संपूर्ण खोली अंधारात करून दाखवते की हे जुगाड किती परिणामकारक आहे – खोली ट्यूबलाइटसारखी उजळून निघते!
हे नक्की कसं काम करतं?
हा प्रकार प्रकाशाच्या अपवर्तन या विज्ञानावर आधारित आहे. जेव्हा मोबाइलच्या टॉर्चमधून प्रकाश पाण्याने भरलेल्या पारदर्शक बाटलीतून जातो, तेव्हा तो वाकतो आणि फैलतो. या प्रक्रियेला Refraction म्हणतात. यामुळे बाटली लेंसप्रमाणे काम करते आणि प्रकाश खोलीभर समान पद्धतीने पसरतो.
लोकांची प्रतिक्रिया काय?
या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या उपायाला खरंच उपयोगी असल्याचं मान्य केलं आहे. काहींनी विचारलं की, “अश्यावेळी फोन आला तर काय होईल?” तर काहींनी या जुगाडामागचं विज्ञान सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला.
मुंबईत मान्सूनचे आगमन!! समुद्राचं पाणी रस्त्यांवर येणार; ऑरेंज अलर्ट जारी
स्वस्त आणि उत्तम उपाय!
या प्रकारासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागतात:
- पारदर्शक प्लास्टिकची बाटली
- स्वच्छ पाणी
- मोबाइलचा टॉर्च
विजेचा खर्च शून्य, साधनं घरातच उपलब्ध आणि परिणाम मात्र दिमाखदार!
पावसाळ्यात विजेचा भरोसा नसतो, पण या देसी जुगाडावर जरूर ठेवू शकता!