हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये होळी, (Holi 2024) धुळवड रंगपंचमी हे सण उत्साहाने साजरी केले जातात. या काळात आपल्याला फक्त रंगांची उधळण पाहायला मिळते. रंगपंचमी दिवशी तर प्रत्येक व्यक्ती रंगांनी माखलेला दिसतो. यात आपण स्वतःला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी कोणी ना कोणी येऊन आपल्याला रंग लावून जाते. आपण देखील या सणाचा तितकाच आनंद लुटतो. परंतु सगळ्यात शेवटी चेहऱ्याला केसांना आणि हाता-पायाला लागलेला रंग कसा काढावा हा प्रश्न वैतागून सोडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे त्वरीत चेहऱ्यावरील, केसांमधील रंग निघून जाईल.
- शक्यतो रंग खेळण्यापूर्वी आपल्या हातापायांना थोडे थोडे तेल चोळा. यामुळे रंगात केमिकल मिसळलेले असले तरी त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर होत नाही. तसेच रंग देखील लगेच निघून जातो. (Holi 2024)
- रंग खेळून झाल्यानंतर तो रंग लगेच पाण्याने काढण्याचा प्रयत्न करू नका. सर्वात प्रथम चेहऱ्याला मॉइश्चरायझर राहून तो हळूहळू पुसून काढा. यासाठी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. असे केल्यास तुम्हाला रंग काढण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही.
- चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी तुम्ही दही, बेसन आणि लिंबू याचे एकत्र मिश्रण करून ते चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरील रंग लवकर निघून जाईल.
- तुमच्या केसांमध्ये केमिकल असलेले रंग गेले असतील, तर केसांना भरपूर तेल लावा. यामुळे तुमच्या केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही. यानंतर शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा पुढे केसांना कंडिशनर देखील लावा.
- चेहऱ्यावरील किंवा त्वचेवरील रंग काढताना ते घासून किंवा कापडाने जोरात पुसूनही काढू नका. यामुळे तुमच्या स्किनला जास्त हानी पोहोचू शकतो.
- तुम्ही केसांमध्ये रंग काढण्यासाठी मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना लावू शकता. यामुळे केसांना लागलेला रंग निघून जाईल. (Holi 2024)