डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाची आत्महत्या; साताऱ्यातील घटनेने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. डॉक्टरांनी संगणमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकांनी चिठ्ठी मध्ये नमूद केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..

याबाबत अधिक माहिती अशी कि, शशिकांत हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केलं आणि घराची जबरदस्ती नोटरी करून घेत डॉक्टरांनी जबरदस्तीने नावावर करून घेतले आहे.. हे करत असताना डॉक्टरांच्या युवकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर सुहास चव्हाण,डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला आसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..

दरम्यान, या संपूर्ण प्रकारांनंतर ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. IPC ३०६, ३२३, ५०४, ५०६ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्ष मोहन शिंदे, कोरेगाव अन्वेषक पथक करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.