Tirupati Balaji : तिरुपती मंदिराला तूप पुरवलंच नाही; अमूल कंपनीचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) लाडू प्रसादाची चर्चा सुरु आहे. बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत होतं. सर्वत्र अशी चर्चा सुरु होती कि रुमला तिरुपती मंदिराला तूप पुरवण्याचे काम अमूल कंपनी करत आहे. मात्र कप्पणीने एक परिपत्रक जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमूल कंपनीने तिरुपती देवस्थानाला कधीच तूप पुरवठा केला नाही असं स्पष्टकरीण देण्यात आलं आहे.

अमूलने नेमकं काय म्हंटल? (Tirupati Balaji)

तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirupati Balaji) ला अमूल तूप पुरवले जात असल्याचा उल्लेख करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात हे आहे. आम्ही हे कळवू इच्छितो की आम्ही कधीही TTD ला अमूल तूप पुरवठा केला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते.

अमूल तूप 50+ वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात विश्वासार्ह तूप ब्रँड आहे आणि भारतीय घरांचा अविभाज्य भाग आहे. अमूलविरोधातील ही चुकीची माहिती देणारी मोहीम थांबवण्यासाठी ही पोस्ट जारी करण्यात येत आहे. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, कृपया आमच्या टोल-फ्री नंबर 1800 258 3333 वर कॉल करा असं स्पष्टीकरण अमूलने दिले आहे.