Tirupati Balaji : बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर…; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल होते. यानंतर याबाबत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या रिपोर्टमधून आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर माशांचे ऑइल सुद्धा वापरण्यात आल्याचे अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लाडू बनवण्यासाठी बीफ फॅट, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचा दावा सत्ताधारी टीडीपीने केला आहे.

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकारांना कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्यामध्ये दाखवलेल्या तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी झाली आहे. कथित प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे. नमुने स्वीकारण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै चा होता. वेंकट रमण रेड्डी यांनी या रिपोर्टची प्रतही शार केली आहे. परंतु प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकार किंवा तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (TTD) यांच्या प्रयोगशाळेच्या अहवालावर अधिकृत पुष्टी नाही.

भक्तांच्या भावना दुखावल्या- Tirupati Balaji

दरम्यान, तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मंडळाने गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडून तूप खरेदी केलेले नाही, असे कर्नाटक दूध महासंघाने गुरुवारी सांगितले. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) सत्तेत आल्यापासून नंदिनी समूह तूप पुरवत असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. या एकूण सर्व प्रकरणानंतर भाविकांना मात्र मोठा झटका बसला आहे. कारण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे नक्कीच्या त्यांच्या भावना दुखावल्या असतील हे मात्र नक्की….