Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? नव्या आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुमाला पर्वतावर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर 9Tirupati Balaji) हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो करोड भक्त व्येंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. मात्र आता याच बालाजीच्या प्रसादावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली – Tirupati Balaji

चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएच्या बैठकीत सांगितले की, मागील वायएसआर काँग्रेस सरकारने तिरुमलाच्या पावित्र्याला हानी पोहोचवली होती. वायएसआर काँग्रेस सरकारने प्रसादाचा दर्जाच कमी केला नाही तर लाडूंमध्येही भेसळ केली. तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असं देखील चंद्राबाबूं नायडूंनी सांगितलं.

या दाव्यानंतर आंध्र प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच चंद्राबाबूंच्या या नव्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंचा हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंचे आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचे सांगत नायडूंवर निशाणा साधला चंद्राबाबू नायडू तिरुमलाच्या पावित्र्याला हानी पोहोचवत आहेत. नायडू कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवत आहेत. चंद्राबाबू नायडू केवळ राजकीय फायद्यासाठी असे निराधार आरोप करत आहेत. ते खरे बोलत असतील तर त्यांनी कुटुंबासह तिरुमला येथे जाऊन शपथ घ्यावी, असे आव्हान त्यांनी नायडूंना दिले