TISS Mumbai recruitment 2024 | बी कॉम उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी; महिन्याला 25 हजार पगार

TISS Mumbai recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | TISS Mumbai recruitment 2024 ज्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे. अशा उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबईच्या टाटा सोशल सायन्समध्ये एक मोठी भरती चालू झालेली आहे. लेखा सहाय्यक म्हणजेच अकाउंटंट असिस्टंट (TISS Mumbai recruitment 2024) या पदासाठी भरती चालू झालेली आहे.या पदांसाठी एकूण तीन रिक्त जागा आहेत. आणि त्या जागांसाठी ही भरती चालू झालेली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी लगेच अर्ज करा. आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्जाची प्रक्रिया या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक पात्रता | TISS Mumbai recruitment 2024

लेखा सहाय्यक किंवा अकाउंट असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉमर्स शाखेतील B. COM किंवा M. COM ही पदवी असणे खूप गरजेचे आहे. केवळ याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

दरमहा वेतन

या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 25 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांना या नोकरीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर उमेदवाराची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्जशुल्क

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 500 रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, पीडब्ल्यूडी या प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 एप्रिल 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. या तारखेनंतर भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. आम्ही खाली ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.