आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र; जाणून घ्या यामागील खगोलीय कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वैज्ञानिक आणि खगोलीय घटना नेहमीच आपल्याला अचंबित करून टाकणाऱ्या असतात. आज अशीच एक अचंबित करणारी घटना घडत आहे. आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असणार आहे. याबाबतची माहित खगोल व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

आज म्हणजे शुक्रवारी वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आहे. वर्षातून दोनदा पृथ्वीवर अयनदिन घडत असतात. यात 21 आणि 22 डिसेंबर दक्षिण अयनदिन, तर 22 व 22 जूनला उत्तर अयनदिन होता. आज बरोबर 22 डिसेंबर तारीख असल्यामुळे वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र आज आहे.

यावर्षी आयनदिन हा 22 डिसेंबरला भारतीय वेळानुसार सकाळी 8.57 ला सुरू होत आहे. ज्या वेळेला मकरवृत्तावर सूर्य येतो त्यावेळी पृथ्वीचा ध्रुव 23.5 अंश उत्तरेला कललेला असेल. ती वेळ म्हणजेच अयनदिन होय. मात्र यामध्ये दिवस रात्रीच्या वेळा भिन्न असतात. यावर्षी आयन दिन 22 डिसेंबर रोजी सकाळी येत असल्यामुळे 21 आणि 22 डिसेंबरचे दोन दिवस अगदी थोड्या काही फरकाने यात बदल पाहिला मिळेल. ज्यामुळे 22 डिसेंबरचा दिवस आपल्याला लहान आणि रात्र मोठी अशा पद्धतीने अनुभवता येईल.