हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll Tax Free । खासगी गाडीने प्रवास म्हंटल कि आपल्याला टोल हा द्यावाच लागतो. मग तो गाड्यांच्या कॅटेगरी नुसार वेगवेगळा असतो. लहान चारचाकी गाडयांना टोल कमी असतो तर ट्रक सारख्या मालवाहतूक करणाऱ्या गाडयांना जास्तीचा टोल आकारावा लागतो. नुकतंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन टोल प्रणालीची घोषणा करत राष्ट्रीय महामार्गावर ३००० रुपयांच्या fastag पास चा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता एकाच ३००० रुपयांचा पास काढून तुम्ही वर्षभर प्रवास करू शकणार आहेत. परंतु, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? भारतात असे काही लोक आहेत ज्यांना कधीच टोल भरावा लागत नाही. कोणताही हायवे असूद्या, ‘या’ लोकांना टोल टॅक्स लागत नाही.. हे प्रवासी नेमके आहेत कोण? तेच आज आम्ही तुम्हाला सांगतो.
नवीन महामार्ग तयार झाला की त्यावर टोल प्लाजा उभारला जातो आणि वाहन चालकांकडून टोलची वसूली केली जाते. टोल प्लाजा मधूनच जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न महामार्गावरील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरले जाते सोबतच महामार्गाच्या देखभाली साठी सुद्धा या उत्पन्नाचा वापर केला जातो. हेच आजवरचं गणित राहिले आहे. या नियमानुसार भारतातील सर्वच व्यक्तींकडून समान टोल आकारावा लागतो. परंतु काही जणांना कायमची टोल मुक्ती (Toll Tax Free) देण्यात आली आहे.
कोणाकोणाला टोल भरावा लागत नाही – Toll Tax Free
1) भारताचे राष्ट्रपती
2) भारताचे उपराष्ट्रपती
3) भारताचे पंतप्रधान
4) सरन्यायाधीश
5) लोकसभेचे अध्यक्ष
6) भारत सरकारचे सचिव
7) लोकसभेचे सचिव
8) राज्यसभेचे सचिव
9) लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख
10) कमांड क्षेत्रांचे कमांडर
11) राज्यांचे मुख्य सचिव
12) राज्य विधानसभा/विधान परिषदेचे सचिव
13) संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी (जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात)
14) पोलिस विभागाचे अधिकारी (जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात)
15) राज्यांचे राज्यपाल
16) राज्यांचे मुख्यमंत्री
17) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
18) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
19) संसद सदस्य (खासदार)
20) राज्यांच्या विधान परिषदांचे सदस्य
21) विधानसभा सदस्य (आमदार) ( स्थानिक नेत्यांना फक्त राज्यातच सूट मिळते.)
पुरस्कार विजेते- अधिकाऱ्यांनाही टोल सूट –
देशाची सेवा केल्याबद्दल भारत सरकारकडून काही विशेष व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. अशा व्यक्तींना टोल टॅक्स भरण्यापासून देखील सूट दिली जाते. यामध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र विजेते यांचा समावेश आहे. यासाठी त्यांना फोटो असलेले ओळखपत्र दाखवावे लागते. यामध्ये संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, अधिकृत कामासाठी जाणारे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी, निमलष्करी दल, केंद्रीय आणि सशस्त्र दलाचे पोलिस गणवेशातील अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, अग्निशमन विभाग किंवा संघटना, एनएचएआय किंवा अशा कोणत्याही संस्थेचे लोक जे त्यांचे वाहन तपासणी, सर्वेक्षण कामासाठी वापरत आहेत, त्यांनाही टोल टॅक्स भरण्यापासून सूट (Toll Tax Free) देण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शववाहीका यांनाही टोल मधून वगळण्यात आलं आहे.




