हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रवाशांसाठी निराशाजनक बातमी आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून टोल टॅक्स मध्ये वाढ (Toll Tax Hike) करण्यात आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. खरं तर टोलच्या किमतीमधील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली. अखेर आजपासून वाहनचालकांनाअनेक टोल प्लाझांवर 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
आजपासून देशभरातील सुमारे 1,100 टोल प्लाझांवरील टोल दरात 3 ते 5 टक्के वाढ (Toll Tax Hike) होणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिघातघात राहाणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढले आहेत. खरं तर टोल प्लाझा दरवाढ हा गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा बनला आहे.रस्ते प्रकल्पांच्या विकासासाठी हे महत्वाचे असल्याचा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे करण्यात येतो तर विरोधक तर आता या दरवाढीनंतर सरकार विरोधात रान उठवण्याची शक्यता आहे.
कोणत्या वाहनासाठी किती टोल भरावा लागेल? Toll Tax Hike
कार/जीप/हलकी वाहने – जुने दर – 105, नवीन दर – 110 ह
लके कमर्शियल/लगेज वाहन/मिनी बस – जुने दर – 170, नवीन दर – 175
बस/ट्रक – जुने दर – 355, नवीन दर – 365
थ्री एक्सल कमर्शियल व्हेईकल – जुने दर – रु. 385, नवीन दर – रु. 395
चार ते सहा एक्सल वाहने – जुने दर – 555, नवीन दर – 570
7 एक्सल किंवा मोठ्या आकाराचे वाहन – जुने दर – 680, नवीन दर – 695