Top 5 Beaches In Goa: गोव्यातील टॉप 5 समुद्रकिनारे; उन्हाळ्यात नक्की भेट द्या

Top 5 Beaches In Goa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Top 5 Beaches In Goa – गोवा, भारतातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ, केवळ त्याच्या ऐतिहासिक वारशासाठीच नव्हे तर सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी देखील ओळखले जाते. अरेबियन समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या गोव्यात अनेक सुरेख अन स्वच्छ समुद्रकिनारे आहेत जे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा अनुभव देतात. स्थानिक संस्कृती, जलक्रीडा, नाईटलाइफ अन चविष्ट खाद्यपदार्थांसोबत हे किनारे एक परिपूर्ण पर्यटन अनुभव देतात. चला तर मग गोव्यातील ५ टॉप (Top 5 Beaches In Goa) समुद्रकिनाऱ्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पालोलेम बीच (Palolem Beach – Top 5 Beaches In Goa)

पालोलेम बीच हे गोव्याच्या दक्षिण भागात असलेलं एक अतिशय आकर्षक अन शांत समुद्रकिनारा आहे. पांढऱ्या वाळूचा किनारा आणि नारळाच्या झाडांनी वेढलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आदर्श आहे. येथे पर्यटक कायकिंग, डॉल्फिन सफारी, आणि योगा रिट्रीट्सचा अनुभव घेऊ शकतात. शांततामय सुट्टीसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.

बागा बीच (Baga Beach) –

बागा बीच हा गोव्याचा सर्वाधिक गर्दीचा आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा मानला जातो. येथे टिटो आणि मम्बो सारख्या क्लब्समुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. येथे पॅरसिलिंग, जेट स्कीइंग, बॅनाना राईड यांसारख्या विविध जलक्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. खवय्यांसाठी बागा किनार्‍यावर उत्कृष्ट सी-फूड रेस्टॉरंट्सची रेलचेल आहे.

मिरामार बीच (Miramar Beach) –

मिरामार बीच हा गोव्यातील सर्वात शहराजवळचा समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण पंजिम शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे स्थानिक लोकांसह पर्यटकांसाठीही पसंतीचं आहे. येथे संध्याकाळी फेरफटका मारायला, समुद्रकिनारी खेळायला, तसेच फोटो काढायला अनेक पर्यटक भेट देतात. गोवा विज्ञान केंद्र, कला अकादमी अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या जवळ असल्याने येथे एक दिवस सहज घालवता येतो.

अश्वेम बीच (Ashwem Beach) –

अश्वेम हे उत्तर गोव्यातील (Top 5 Beaches In Goa) तुलनेने कमी गर्दीचं पण फारच सुंदर समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण विशेषतः युरोपीयन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे लक्झरी रिसॉर्ट्स, योगा सेंटर्स, आणि आयुर्वेदिक मसाज सेंटर्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहून शांत सुट्टी घालवायची असेल, तर अश्वेम हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

अरंबोल बीच (Arambol Beach) –

अरंबोल हे गोव्याच्या (Top 5 Beaches In Goa) उत्तर टोकाला असलेला एक अनोखा समुद्रकिनारा आहे. हे बीच त्याच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे दररोज संध्याकाळी फायर डान्स, लाईव्ह म्युझिक अन योगा सेशन्स पाहायला मिळतात. बहुतांश परदेशी पर्यटक येथे काही आठवडे राहून ध्यानधारणा व आर्टवर्कमध्ये गुंतलेले दिसतात. येथे छोट्या हँडमेड वस्तूंचे बाजारही भरतात.