फेब्रुवारीत फिरण्यासाठी या TOP 5 सर्वोत्तम ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या थंडी असली तरी जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. कारण या महिन्यात वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. तुम्हीही या महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत आहात? असाल तर तुम्हाला फिरण्यासाठी सर्वोत्तम अशी काही ठिकाणी आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल…

Jaisalmer 02

1) जैसलमेर (Jaisalmer)

राजस्थानमधील जैसलमेर फेब्रुवारी महिन्यात भेट देण्यासाठी एक अतिशय उत्तम ठिकाण आहे. या महिन्यात जेसलमेरमध्ये तुम्ही उंट सफारीचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला राजस्थानची परंपरा आणि संस्कृती बघायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यातील वातावरण जैसलमेरला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जेसलमेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जेसलमेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे पश्चिम राजस्थानात असून प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या शहराला मानाने गोल्डन सिटी असे म्हंटले जाते. या शहरातील मध्ययुगीन प्राचीन किल्ला आजही शाबूत आहे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

Jaisalmer

जैसलमेरमधील इतर प्रेक्षणीय स्थळे

Jaisalmer 01

जैसलमेरचा किल्ला (Jaisalmer Fort) : राणा जैसल याने बांधलेला हा पिवळ्या दगडातील किल्ला गेली हजार वर्षे जैसलमेर मध्ये उभा आहे. या किल्ल्यात प्रवेश मोफत आहे. किल्ल्यात अतिशय सुरेख बांधकाम असणारा राजवाडा आहे. तसेच एक अतिशय कोरीव काम कसणारे जैन मंदिर आहे. खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

patwa haveli

पटवा हवेल्या (Patwa Havelias) : पटवा बंधूनी १८७० च्या सुमारास बांधलेल्या या पाच हवेल्या आपल्या कोरीव कामासाठी विख्यात आहेत. पटवा बंधू हे व्यापारी होते आणि त्यांच्या संपत्तीची कल्पना हा हवेल्यांच्या बांधकामावरून येते. “नाथमलजी कि हवेली” या नावाने प्रसिद्ध असणारी एक हवेली पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. हवेली बघण्यासाठी १०० रुपये तिकीट आहे.

पटवा हवेल्या

सलीम सिंघ कि हवेली (Salim Singh Ki Haveli) : सलीम सिंघ हा जैसलमेरच्या राजाचा दिवान होता याची हवेली तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शिखरासाठी प्रसिद्ध आहे.

गडीसर तलाव

गडीसर तलाव (Gadisar Lake) : राजा रावल जैसल याने बांधलेला हा तलाव जैसलमेरचा पाण्याचा एकमात्र स्रोत होता. तलावाकाठी असणारे मंदिर आणि कमान प्रेक्षणीय आहे. असे म्हणतात कि एका नर्तकीने ही कमान बांधून घेतली. राजाने ही कमान तोडू नये म्हणून तिने या कमानीच्या वरच्या मजल्यात एक श्रीकृष्णाचे मंदिर बनवले. राजाला, नर्तकीने बनवलेल्या कमानीतून जाणे अपमानास्पद वाटल्याने त्याने बाजूने एक वेगळाच जिना बनवून घेतला.

बडा बाग

बडा बाग आणि सेना संग्रहालय (Big Garden) : या ठिकाणी राज घराण्यातील अनेकांच्या कोरीव समाध्या आहेत. शिवाय भारतीय सेनेच्या तीनही दलांची माहिती देणारे संग्रहालय जैसलमेरच्या बाहेर आहे.

Kohima

2) कोहिमा (Kohima)

तुम्ही जर भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोहिमाला नक्की भेट द्या. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. या शहरामध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्ही जप्पू पीक, जुको व्हॅली, कोहिमा व्हिलेज इत्यादी गोष्टी बघू शकतात. कोहिमा हे जंगलाच्या शिखरांनी आणि भव्य टेकड्यांनी वेढलेले एक सुंदर शहर आहे.

Kohima

निसर्गाच्या सौंदर्याव्यतिरिक्त, येथे, तुम्हाला संस्मरणीय मुक्कामासाठी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सर्वोत्तम निवासस्थानांचा शोध घेता येईल. जर तुम्हाला खूप एन्जॉय करायचा असेल, तर शहरातील विविध पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही खरोखरच चांगला वेळ घालवण्याची अपेक्षा करू शकता.

जयपुर पिंक सिटी

3) जयपुर पिंक सिटी (jaipur Pink City)

प्रसिद्ध असलेले जयपूर शहर फेब्रुवारी महिन्यात फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या महिन्यात जयपुरमध्ये वातावरण अतिशय अल्हाददायक असते. त्यामुळे तुम्ही जयपुरमध्ये तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात. जयपूर शहर भारतातील सर्वात मोठ्या राज्य राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला गुलाबी शहर किंवा गुलाबी शहर देखील म्हटले जाते.

Hawa mahal

4) हवा महल (Hawa Mahal)

हवा महल हा भारताच्या राजस्थान राज्याची राजधानी जयपूरमधील एक राजवाडा आहे. हे महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी 1799 मध्ये बांधले होते आणि वास्तु विशारद लालचंद उस्ता यांनी ‘राजमुकुट’ सारखे डिझाइन केले होते. वरच्या बाजूला फक्त दीड फूट रुंद असलेली तिची अनोखी पाच मजली इमारत, बाहेरून पाहिल्यास मधमाशाच्या पोळ्यासारखी दिसते, 953 अतिशय सुंदर आणि आकर्षक छोट्या जाळीच्या खिडक्या आहेत, ज्यांना झारोखा म्हणतात. या खिडक्या जाळीदार बनवण्यामागची मूळ कल्पना अशी होती. चुना, लाल आणि गुलाबी वाळूच्या दगडाने बांधलेला हा राजवाडा जयपूरच्या व्यापारी केंद्राच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर वसलेला आहे. हा सिटी पॅलेसचाच एक भाग आहे आणि झेनाना रूम किंवा महिलांच्या खोलीपर्यंत विस्तारलेला आहे.

Hawa mahal

जयपूर शहरात जंतरमंतर, हवा महल, सिटी पॅलेस, गोविंददेवजी मंदिर, श्री लक्ष्मी जगदीश महाराज मंदिर, बीएम बिर्ला तारांगण, अंबर किल्ला, जयगड किल्ला इत्यादी अनेक पर्यटन स्थळे आहेत. जयपूरच्या गजबजलेल्या बाजारांमध्ये रंगीबेरंगी वस्तूंची दुकाने भरलेली आहेत. ज्यात हातमागाची उत्पादने, मौल्यवान दगड, हस्तकला भाजीचे रंग, मीनाकारी दागिने, पितळ सजावटीच्या वस्तू, राजस्थानी चित्रांचे नमुने आहेत.

Orchha

5) ओरछा (Orchha)

बेटवा नदीच्या काठी ओरछा शहर वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक आकर्षक ठिकाणं बघायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही जहागीर महाल, राज महाल, रॉय प्रवीण महाल, फुलबाग इत्यादी प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात. ओरछा येथील किल्ला त्याच्या मोहकतेसाठी देशभर प्रसिद्ध आहे, जो येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या हृदयावर एक वेगळीच जादू करतो. याशिवाय चतुर्भुज मंदिर, राज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर ही ओरछाची मुख्य आकर्षणे आहेत जी येथे येणाऱ्या लोकांसाठी ही भेट संस्मरणीय बनवतात.ओरछाच्या प्रवासाचे मुख्य केंद्र राम राजा मंदिर आहे.