Top 5 block bluster movies in 2024 | 2024 मध्ये या चित्रपटांनी जिंकली प्रेक्षकांची मने; बॉक्स ऑफिसवर केला कल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top 5 block bluster movies in 2024 । 2024 वर्षात चित्रपट सृष्टीत अनेक विविध प्रकारचे आणि आकर्षक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या वर्षात सामाजिक, रोमांचक, ऐतिहासिक, आणि प्रेरणादायक चित्रपटांनी सिनेमा प्रेमींना दिलासा दिला आहे . त्यामुळे असंख्य चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. 2024 हे साल सिनेमा सृष्टीत एक नवे वळण घेऊन आले आहे , ज्याने विविध वयोमानानुसार लोकांना भारावून टाकले आहे. तर आज आम्ही तुम्हाला असे टॉप चित्रपट सांगणार आहोत जे सामाजिक , शैक्षणिक आणि कंटेन्टच्या दृष्टितिकोनातून महत्वाचे ठरणार आहेत. तर चला पाहुयात ते कोणते चित्रपट आहेत.

लापता लेडीज | Top 5 block bluster movies in 2024

लापता लेडीज या चित्रपटाला किरण राव यांनी दिग्दर्शित केले असून , हा मूवी सामाजिक, विनोदी ड्रामावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ग्रामीण भारतातील दोन नवविवाहित वधूंच्या आयुष्याभोवती फिरताना दिसते . तसेच यामध्ये घुंगट ( पडदा ) हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे यात रूढीवादी प्रथांचे प्रतीक ठळकपणे उमटलेले दिसते . घुंगटामुळे चित्रपटातील नवविवाहित महिलांची ओळख लपवली जाते. ज्यामुळे यांची ओळख समोर येऊ शकत नाही. यामुळे दोन्ही वधूंची अदलाबदल होऊन वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जातात. नंतर या संघर्षांच्या दरम्यान या दोन महिलांना स्वतःची ओळख सापडते आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची हिंमत मिळते. असं बरच काही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. यामुळे 2024 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये याला क्रिटिक्स चॉइस पुरस्कार (सर्वोत्कृष्ट चित्रपट) मिळाला , तसेच 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाला पाठवण्यात आले असून, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

महाराजा

महाराजा हा चित्रपट 2024 मधील खूप गाजलेला असून , यामध्ये विजय सेठुपती यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. या मूवीमध्ये खूपच रोमांचक आणि थरारक कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विजय सेठुपती एक न्हावी म्हणून दाखवलेला असून, तो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. तसेच अनुराग कश्यप यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटातील रहस्यमय, थरारक घटकांमुळे प्रेक्षकांना खूप आकर्षित केले आहे.

मैदान

मैदान हा चित्रपट अजय देवगणचा प्रमुख भूमिकेतील एक प्रेरणादायक स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट आहे, जो भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे, आणि तो 1950 आणि 60 च्या दशकातील भारताच्या फुटबॉल संघाचा संघर्ष आणि यश दाखवलेले आहे. अजय देवगण या चित्रपटात श्रीनिवास रहीम साहब, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारत आहेत. यामध्ये खेळाडूंचे मुद्दे, राजकारणातील हस्तक्षेप, तसेच व्यक्तिगत संघर्ष यांचा समावेश आहे.

पुष्पा 2

पुष्पानंतर पुष्पा 2 द रूल या चित्रपटात अल्लू अर्जुन यांनी महत्वाची भूमिका साकारलेली आहे. यामध्ये पुष्पा राज याच्या संघर्षाची आणि त्याच्या सामर्थ्याच्या वाढीची कथा दर्शविली आहे. तसेच रश्मिका मंदाना श्रीवल्ली म्हणून मुख्य भूमिका साकारत आहे, आणि फहद फासिल पुन्हा या भागात खलनायक म्हणून दिसत आहे. या चित्रपटाच्या गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडलेली आहे. साम्राज्याची कहाणी तसेच ऍक्शन सीनसाठी हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाची अनेक तिकिटे विकली गेले असून, यामुळे एक मोठे रेकॉर्ड बनवले आहे.

द गोट लाइफ

द गोट लाइफ हा एक खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. मल्याळी इमिग्रेंट नजीब मुहम्मद यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट 1991 मध्ये सऊदी अरेबियाला गेलेल्या नजीबच्या संघर्षाची कथा सांगतो. वाळवंटात पाण्याची कमतरता आणि माणुसकीवर विश्वास उडवणाऱ्या परिस्थितींमध्ये त्याने मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचा कळप सांभाळला. या चित्रपटाने माणसाच्या संघर्ष आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायक चित्रण केले आहे.