Top 5 political news | लोकसभेत महायुतीचा सुफडा साफ ते अजित पवार 6 व्यांदा उपमुख्यमंत्री; 2024 मध्ये बदलले राज्याचे राजकारण

Top 5 political news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top 5 political news | 2024 मध्ये राज्याच्या राजकारणात अधिक घडामोडी घडलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक चक्र फिरलेली आहेत. ज्यामध्ये काही घटनांचा उल्लेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटनांमुळे आणि त्या नेत्यांमुळेच राज्याचे राजकारण पूर्णपणे फिरलेले आहे. आज आपण 2024 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कोणकोणत्या मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे झाला हे जाणून घेणार आहोत.

लोकसभेला महायुतीचा सुफडा साफ

महाराष्ट्रमध्ये महायुती सरकार सत्तेत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला महायुतीला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळेल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्यांच्या या आशांवर पूर्णपणे पाणी फेरले. आणि महायुतीमधील अनेक उमेदवारांना पराजय पत्करावा लागला. याउलट महाविकास आघाडीला लोकांकडून प्रतिसाद मिळणार नाही, असे वाटत असताना देखील महाविकास आघाडीच्या अनेक जागा निवडून आल्या. आणि हा लोकसभा निवडणुकीला महायुतीला एक खूप मोठा फटका बसलेला आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा झंझावाती प्रचार

विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये जवळपास 56 जाहीर सभा घेतलेल्या होत्या. राज्यातील 45 मतदार संघातून 56 सभांचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे होते. एका दिवशी ते जवळपास चार ते पाच सभा घेत होते. त्यांनी बारामती मतदार संघातून गावातील प्रचाराला सुरुवात केली होती. या प्रचारादरम्यान ते अगदी गावोगावी जाऊन सभा घेत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांना प्रचार सभेचा चांगला फायदा झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला देखील हा फायदा होईल. म्हणून त्यांनी हा झंझावती प्रचाराला सुरुवात केली होती.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश

लोकसभा निवडणूकीमध्ये राज्यातील महायुती सरकारला अपयश आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला देखील काहीसे असेच चित्र दिसेल, असे सगळ्यांना वाटले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे बदलले. आणि राज्यामध्ये महायुती सरकार भरघोस मतांनी निवडून आलेले आहे. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांना पराजय पत्करावा लागला आहे. तिथेच महायुती सरकारचे अनेक उमेदवार निवडून आल्याने, राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन झालेले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

महायुती सरकारमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट असे मिळून महायुती सरकार स्थापन झालेले आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजप पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा राज्यांमध्ये भाजप सरकार आलेले आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे.

अजित पवार 6 व्यांदा उपमुख्यमंत्री

महायुती सरकारमध्ये अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप मिळून महायुती आहे. यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार हे राज्याचे एकमेव असे नेते आहेत, ज्यांनी सहाव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.