Top 5 political news | 2024 मध्ये देशाच्या राजकारणात देखील अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. राजकीय वर्तुळातून मोठ्या घटना समोर आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांसाठी अत्यंत आश्चर्यकारक होत्या. राजकारणातील याच घटनांमुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आज आपण 2024 मध्ये देशाच्या राजकारणात नक्की कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या? आणि त्याचा देशातील जनतेवर नक्की कशा प्रकारे परिणाम झाला? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
लोकसभेमध्ये एनडीए विजयी | Top 5 political news
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए पक्ष विजयी झालेला आहे. एनडीएला सगळ्यात जास्त बहुमत मिळाल्याने विजयी झालेले आहेत. या वर्षी ममता बॅनर्जी दूर गेल्यामुळे आणि नितेश कुमार हे एनडीएमध्ये गेल्यामुळे इंडिया आघाडी कमकुवत होईल असे चित्र दिसत होते. परंतु या निवडणुकीत कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप चांगली दिसून आलेली आहे. त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा फायदा देखील इंडिया आघाडीला झाला. आणि यावर्षी एनडीए सरकार लोकसभेमध्ये सर्वाधिक मताने विजयी झालेले आहे. देशातील राजकारणातील ही एक मोठी घटना होती.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला शिंदे गट, भाजप भुईसपाट
यावर्षीचा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत आश्चर्यकारक होता. या निवडणुकीमध्ये महायुती सरकार मधील शिंदे गटाने आणि भाजप यांना चांगली मते मिळून विजयी होतील, अशी अनेकांची इच्छा होती. सुरुवातीला तसे संपूर्ण चित्र दिसत होते. परंतु या लोकसभा निवडणूकित शिंदे गट आणि भाजप मात्र भुई सपाट झाल्याचे दिसले. या उलट शरद पवार गटातच्या अनेक आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विजय मिळवलेला आहे.
हरियाणा मध्ये भाजप सरकार
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने विजय मिळवलेला आहे. यावर्षी भाजपने सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक मिळवलेली आहे. हरियाणामध्ये या आधी कुठल्याच एका पक्षाचे सरकार सलग तीन वेळा निवडून आलेले नाही. लोकसभा निवडणूकमध्ये भाजपला हरियाणामध्ये काहीसा फटका बसला होता. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते देखील निराश झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले आणि हरियाणामध्ये भाजपचा विजय झालेला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेला फडणवीस सरकार
महाराष्ट्रातील विधानसभा 2024 मध्ये फडणवीस सरकार आलेले आहे. यावर्षी भरघोस मतांनी महायुती सरकार विजयी झाली आहे. या महायुतीमध्ये भाजप पक्ष शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी सत्ता राखली
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्ता राखलेली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाने भाकप माले यांचा समावेश होता. या इंडिया आघाडीने झारखंड विधानसभेमध्ये 81 पैकी 56 जागा मिळवून विजय मिळवलेला आहे. इंडिया आघाडीला दोन तृतीयांश एवढी मते मिळालेली आहे.