हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या फेब्रुवारी महिना संपत आला असून अध्यापही थंडी कायम आहे. या थंडीत उबदार कपडे घालून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण फिरण्याचा प्लॅन करत आहेत. तुम्हालाही गुलाबी थंडीत उबदार गर्मीचा आनंद लुटायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील 6 जिल्हे असे आहेत कि त्या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. चला तर मग पाहूया गरम पाण्याची झरे…
महाराष्ट्र राज्य देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, नैसर्गिक सुंदरता असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात थंड हवेच्या ठिकाणांबरोबर गरम पाण्याची झरे असलेली अशी 6 ठिकाणे आहेत. कि त्या ठिकाणी तुम्ही कधीही गेल्यास तेथे गरम पाणी पहायला मिळते.
असे म्हटले जाते की गरम पाण्यात त्वचेची कमतरता बरा करण्याची क्षमता आहे. हे पवित्र स्थान रस्तेंद्वारे उत्तम प्रकारे जोडलेले आहे. पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक जळगाव रेल्वे स्थानक आहे.
1) अकलोली गरम पाण्याचा झरा, ठाणे (Akaloli Hot Spring)
ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी आणि अकलोली या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. वज्रेश्वरी गावाच्या परिसरात गरम पाण्याचे झरे आहेत. त्याच्या पुढील भागात अकलोली येथेही गरम पाण्याचा झरा असून येथे स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी मानले जाते. येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
2) उनकेश्वर गरम पाण्याचे झरे, नांदेड (Anshwar Hot Spring)
महाराष्ट्र जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणातील माहूर-किनवट रोडवर माहूर शहरापासून २५ किमी अंतरावर किनवट तालुक्यात वसलेले उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्यात औषधी तत्वे असल्यामुळे येथील पाण्यात अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्मूलन होते. यामूळे अनेक लोक येथे स्नान करण्यासाठी भेट देतात. आख्यायिके नुसार प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगताना सीता व लक्ष्मणासह या ठिकाणी काही काळ व्यतीत केल्याचे वर्णन आहे.
3) उनपदेव गरम पाण्याचा झरा, जळगाव (Unpadeo Hot Spring)
महाराष्ट्रातील वैविध्यतेने नटलेल्या खान्देशाच्या भूमीत जळगाव जिल्ह्यात चांगदेव, अडावद, उनपदेव, सुनपदेव आणि नाझरदेव या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. या जिल्ह्यातही निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. या परिसराला लाभलेल्या या गरम पाण्याच्या झऱ्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देतात. उनपदेव हे सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. सातपुडा पर्वत रांगेतले इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनपदेव आणि निझारदेव. तीनही ठिकाणे रामायण महाकाव्यात आढळली आहेत आणि अयोध्येतील चौदा वर्षांच्या बहिष्कारानंतर प्रभू राम यांचा स्पर्श आहे. गोड पाणी वर्षभर संपूर्णपणे वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाला आणखी एक परिमाण जोडते. असे म्हटले जाते की गरम पाण्यात त्वचेची कमतरता बरा करण्याची क्षमता आहे.
4) दापोली उन्हेरे गरम पाण्याचा झरा, रत्नागिरी (Dapoli Spring)
कोकणातील एक प्रमुख जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर उन्हवरे गाव आहे. गावात शिवमंदिर असून या मंदिर परिसरातील भिंतीपलीकडून गरम पाण्याचे झरे वाहतात. परिसरात असलेल्या गोमुखातून २४ तास धारा वाहते. रत्नागिरी जिल्ह्यात उन्हावरे, अरावली, तुरळ आणि राजापूर याठिकाणी ही गरम पाण्याची झरे आहेत.
5) साव, उन्हेरे गरम पाण्याची झरे रायगड (Raigad hot spring)
रायगड जिल्ह्यास निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. रायगड जिल्ह्यातील साव, उन्हेरे आणि वडवली याठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. याठिकाणी बारमाही पर्यटक येतात. ज्यांना निसर्गरम्य परिसर आणि पक्षीनिरीक्षणाची आवड आहे असे अनेक पर्यटक येथे येवून भेट देवून जातात.
6) सालबर्डी गरम पाण्याची झरे, अमरावती (Salbardi Hot Spring)
अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरम पाण्याचे झरे हे आकर्षण आहे. हे झरे पाहण्यासाठी बारा महिने लोक गर्दी करतात.