जोडीदारासोबत मनसोक्त फिरायचंय? मग या TOP 8 रोमँटिक ठिकाणांना नक्कीच भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्यात प्रेम व्यक्त करण्याचा व्हेलेंटाईन डे हा खास मानला जातो. तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत व्हेलेंटाईन डे साजरा करण्यासाठी व मनसोक्तपणे फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आठ टॉप रोमँटिक ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. पाहू या ती ठिकाणी कोणती आहेत ते…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक पुणे शहराची ओळख आहे. या याठिकाणी अनेक रोमँटिक अशी ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. येथील रोमॅंटिक वातावरण तुम्हाला चांगलंच आवडेल. हा व्हॅंलेटाईन डे तुम्ही इथे अधिक चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल.

ghoradeshwar

1) घोराडेश्वर हिल्स

जर विषय रोमॅंटिक डेस्टिनेशनचा असेल आणि पुण्याच्या जवळ फिरायचं असेल तर तुमच्या यादीत घोराडेश्वर हिल्स हे ठिकाण आवर्जून नोंदवा. अॅडव्हेंचरची आवड असणाऱ्या कपलसाठी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. ३० मिनिटांचा ट्रेक करून तुम्ही टेकडीवर पोहोचू शकता. थंडगार वारा आणि हिरवळ अजून यापेक्षा रोमॅंटिक वातावरण काय हवंय. पुणे शहरापासून हे ठिकाण २५ किलोमीटर अंतरावर आहे.

घोराडेश्वर हिल्स

घोरवडेश्वर हे नाव जवळच असलेल्या आणि इंद्रायणी काठी वसलेल्या घोरवडे या गावामुळे मिळाले आहे. हे ठिकाण सोमाटणे जवळ असलेल्या टोल नाक्यापासून जवळ NH4 हायवे वर आहे. इथूनच जवळच बिर्ला गणपती मंदिर आहे. जिथे गणपती बाप्पाची मोठी मूर्ती डोंगरावरून किंवा हायवे वरुनही दिसते. या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या इसवी सन चौथ्या शतकातील आहेत असे सांगितले जाते.

पवना लेक

2) पवना लेक

लोणावळयाजवळ असलेल्या पवना धरण परिसराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून येतं. मात्र, हिवाळ्यातही पवना धरणाचं वातावरण अधिक रोमॅंटिक होतं. त्यामुळे तुम्ही इथे व्हॅलेंटाईन डे निमित्त फिरायला जाऊ शकता. पवना धरण परिसरात कॅम्पिंगची सुद्धा सुविधा आहे. ज्यासाठी पर्यटक खास येतात. पुणे शहरापासून हे ठिकाण जवळच आहे. पवना तलाव, खंडाळ्याच्या बाहेरील पवना धरणाच्या पाण्याने तयार केलेला एक कृत्रिम तलाव, शहराच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. हे तलाव खंडाळ्याच्या प्रसिद्ध नयनरम्य ठिकाणांच्या मध्यभागी स्थित आहे. नैसर्गिक वनस्पतींनी वेढलेल्या पवना तलावाचे निसर्गरम्य परिसर आणि दृश्य एक उत्कृष्ट सहल क्षेत्र बनवते.

एम्प्रेस गार्डन

3) एम्प्रेस गार्डन

एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग उद्यान एकूण ३९ एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या गार्डनची रचना करण्यात आली आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचा सर्वांचा अनुभव घेता येतो. तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह सुमारे अठराशे देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डन या पुण्याच्या मानबिंदू.

मुळशी धरण

4) मुळशी धरण

पुणेकरांच्या मनाला पावसाळ्यात बहर आणणार, हिवाळ्यात गारवा अन् ऊन्हाळ्यात निरव शांतता देणारं, मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. इथेही भेट देऊनही तुम्ही व्हॅंलेटाईन डे भारी साजरा करू शकता. दुरवर पसरलेलं पाणी, त्यात पक्ष्यांची सदाबहार गाणी.. सभोवताली विस्तारलेली वनराई, मनाला सुखाऊन जाई.. स्वच्छ हवा, त्यात तो पाऊस नवा.. क्षणभर विश्रांती देणार मुळशी हे पुणेकरांच हक्काच पर्यटन स्थळ. वास्तविक पाहता पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारा मुळशी आज समतोल विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग आहे.

सिंहगड

5) सिंहगड

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. हे सुद्धा एक रोमॅंटिक डेस्टिनेशन आहे. सिंहगड, पूर्वी ‘कोंढाणा’ म्हणून ओळखला जाणारा पुण्यातील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय किल्ला आहे. तो डोनाजे, तालुका-हवेली गावात आहे. हे पुण्यापासून २५ किमी दूर १२९० मीटर उंच टेकडीवर आहे. दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके, कल्याण दरवाजा, उदेभानाचे स्मारक आदी प्रसिद्ध ठिकाणे या परिसरात आहेत.

लोणावळा Lonavala

6) लोणावळा (Lonavala)

तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमॅंटिक डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही लोणावळ्याला भेट देऊ शकता. हे पुण्यापासून आणि मुंबईपासूनही जवळ आहे. सोबतच थंडगार वारा आणि मनाला भावणारी हिरवळ तुमच्या मनात घर करेल. व्हॅंलेंटाईन डे साठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. लोणावळा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असून भेट देण्याजोगी अनेक पर्यटन ठिकाणे – नयनरम्य धबधबे, मनमोहक तलाव, किल्ले आणि त्याहून बरंच काही आहे. लोणावळ्यातील टायगर पॉइंट किंवा टायगर लीप हे ६५० मीटर डोंगर शिखरावर वसलेले, हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण आहे. पवना सरोवर हा कृत्रिम जलाशय असून लोणावळ्यात कॅम्पिंगकरिता पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे.

मोराची चिंचोळी

7) मोराची चिंचोळी (Peacock Chincholi)

पुणे – अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात. पावसाळ्यात मोरांचे नृत्य पाहण्याची एक वेगळाच आनंद तुम्हाला या गावात नक्कीच मिळू शकतो. शिवाय या गावांमध्ये पर्यटकांसाठी होमस्टेची व्यवस्थादेखील करण्यात येते.

खंडाळा (Khandala)

8) खंडाळा (Khandala)

लोणावळ्यापासून अगदी पाच किलोमीटरवर असलेलं खंडाळा देखील एक छान पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी आणि पावसाळ्यात गिर्यारोहणासाठी या ठिकाणांना पर्यटक भेट देतात. सर्वात उपयुक्त हिल स्टेशन म्हणजे महाराष्ट्रातील खंडाळा. भारतातील हे लोकप्रिय पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम भागात आहे. हे स्थान, भोर घाटाच्या शेवटी, लोणावळ्याच्या दुसर्‍या हिल स्टेशनपासून सुमारे तीन किलोमीटर आणि कर्जतपासून सात किलोमीटर अंतरावर, गिर्यारोहकांचे नंदनवन आहे. पवना तलाव, खंडाळ्याच्या बाहेरील पवना धरणाच्या पाण्याने तयार केलेला एक कृत्रिम तलाव, शहराच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. हे तलाव खंडाळ्याच्या प्रसिद्ध नयनरम्य ठिकाणांच्या मध्यभागी स्थित आहे.