हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Attractions in Kanyakumari) दक्षिण भारताला अलौकिक नैसर्गिक सौंदर्य, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे. येथील तामिळनाडू हे सर्वात सुंदर, शांत आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न असे ठिकाण मानले जाते. अशा या तामिळनाडूतील कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते. कन्याकुमारी म्हणजे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा एक अनोखा संगम आहे, असे म्हणता येईल. इथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे जर तुम्ही कन्याकुमारीला फिरायला जायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगू त्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
1. थनुमलयन मंदिर (Top Attractions in Kanyakumari)
कन्याकुमारीमध्ये थनुमलयन मंदिर आहे. ज्याला बऱ्याच ठिकाणी थानुमलयन कोविल असेही म्हणतात. या मंदिराचे निस्सीम सौंदर्य मनाला मोहित करते. अत्यंत पवित्र आणि अलौकिक अनुभूती देणारे हे धार्मिक स्थळ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मंडळी येत असतात.
2. अवर लेडी ऑफ रॅन्सम चर्च
कन्याकुमारी शहरात पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत. ज्यामध्ये अवर लेडी ऑफ रॅन्सम चर्च एक सर्वाधिक सुंदर असे स्थळ आहे. (Top Attractions in Kanyakumari) या ठिकाणी अध्यात्मासह अनेक ऐतिहासिक शिल्पे पहायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांसाठी हे स्थळ आकर्षणाची बाब ठरते.
3. विवेकानंद रॉक मेमोरियल
कन्याकुमारीच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल. इथे स्वामी विवेकानंद यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते. (Top Attractions in Kanyakumari) या ठिकाणी बरेच लोक शांतता आणि अध्यात्मात लीन होण्यासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या स्थळाला भेट दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी येथे तब्बल ४० तास ध्यानसाधना केली होती. त्यामुळे हे स्थळ चांगलेच चर्चेत आले होते,
4. थिरुवल्लुवर पुतळा
कन्याकुमारीच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांमध्ये थिरुवल्लुवर पुतळा या स्थानाचे विशेष महत्व आहे. तमिळ साहित्यातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक म्हणून या पुतळ्याची ओळख आहे. (Top Attractions in Kanyakumari) माहितीनुसार, तिरुक्कुलचे लेखक तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा आहे. जो पाहून एखादी जिवंत कलाकृती पाहिल्याचा अनुभव घेता येईल.
5. थिरपराप्पू फॉल्स
थिरपराप्पू फॉल्स हा एक अतिशय सुंदर धबधबा असून कन्याकुमारीच्या सर्वोत्तम ठिकाणांमध्ये याचा समावेश आहे. या धबधब्याच्या पाण्याची खळखळ आणि शुभ्रता पर्यटकांना आकर्षित करते. (Top Attractions in Kanyakumari)