Top champions of Paris Olympic | पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील ‘या’ खेळाडूंनी मिळवले यश; वाचा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top champions of Paris Olympic | 2024 ची पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा पार पडलेल्या आहेत. या पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकट्या भारताने तब्बल 6 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये एक रौप्य पद आहे तर पाच कांस्यपद भारताने मिळवलेली आहे. ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्णपदकापर्यंत पोहोचता आले नाही. परंतु त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. भारताला नेमबाजी, हॉकी, कुस्ती, भालाफेकमध्ये ही पदके मिळालेली आहे. आता पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतासाठी खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मनु भाकर | Top champions of Paris Olympic

मनू भाकर ही नेमबाजीची खेळाडू आहे. नेमबाजी मध्ये मनू भाकर हिने कांस्य पदक मिळवलेले आहे. 22 वर्षीय मनु भाकर हिने नेमबाजींमध्ये दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपद मिळवून नवीन इतिहास रचलेला आहे.

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग

10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकण्याबरोबरच, मनू भाकर याने मिश्र नेमबाजी स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिश्र नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

स्वप्नील कुसळे | Top champions of Paris Olympic

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्याशिवाय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पदक जिंकले. स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले.

भारतीय पुरुष हॉकी संघ

भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. या संघाने कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव करून सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.

नीरज चोप्रा

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

अमन सेहरावत | Top champions of Paris Olympic

भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदक जिंकले. अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा १३-५ असा पराभव करून भारतासाठी पदक जिंकले. त्याने 57 किलो गटात हे कांस्यपदक जिंकले.