Top rising stars of cricket in 2024 | 2024 मध्ये या क्रिकेटपटूंचे उजळले नशीब; केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top rising stars of cricket in 2024 |2024 मध्ये क्रिकेटमध्ये देखील अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. 2024 मध्ये अनेक रायझिंग स्टार देखील समोर आलेले आहेत. क्रिकेटमध्ये त्यांनी चांगलाच जम बसवलेला आहे. आता आपण 2024 मधील अशा काही क्रिकेटरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी 2024 मध्ये त्यांच्या खेळाने चांगली कामगिरी केली आहे. आता 2024 मध्ये या खेळाडूंनी काय कामगिरी केली आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यंदा अशी कामगिरी करणारा जयस्वाल हा भारताकडून एकमेव फलंदाज ठरला आहे. यावर्षी १००० धावांचा टप्पा पार करणारा जैस्वाल हा जगातील दुसरा फलंदाज आहे. जयस्वालने या वर्षात टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 59.23 च्या सरासरीने 1007 धावा केल्या आहेत. यामध्ये जयस्वालची सर्वोच्च धावसंख्या २१४ धावांची होती. या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट पहिल्या स्थानावर आहे. जो रूटने या वर्षात आतापर्यंत 14 कसोटी सामन्यांमध्ये 59.31 च्या सरासरीने 1305 धावा केल्या आहेत. रूटच्या नावावर यंदाही पाच शतके आणि चार अर्धशतके आहेत.

नीतेश रेड्डी | Top rising stars of cricket in 2024

नितीशने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 20 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 20.22 च्या सरासरीने 627 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 54 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने 22 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 36.63 च्या सरासरीने 403 धावा केल्या आहेत आणि 14 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 20 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 128.24 च्या स्ट्राइक रेटने 395 धावा केल्या आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत. नितीशने 2021 मध्ये लिस्ट-ए पदार्पणात विदर्भाविरुद्ध अर्धशतक झळकावले. अष्टपैलू खेळाडूंमध्ये तो हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक्सला आपला आदर्श मानतो. 2017-2018 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल BCCI ने त्याला अंडर-16 जगमोहन दालमिया पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हॅरी ब्रूक

हॅरी ब्रूकने 2024 साली कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने या वर्षात आतापर्यंत 1000 कसोटी धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक हा डॉन ब्रॅडमनच्या दिग्गजांच्या यादीत सामील होऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 8 शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. ब्रूकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 38व्या डावात हा पराक्रम केला. यासह, तो 2024 साली कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला आहे, ज्यामध्ये त्याच्याआधी जो रूट, यशस्वी जैस्वाल आणि बेन डकेट यांनी ही कामगिरी केली होती. हॅरी ब्रूकची परदेशी भूमीवर कसोटी कारकिर्दीतील ही 16वी कसोटी खेळी होती, ज्यामध्ये तो सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. असे करून त्याने डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी परदेशी भूमीवर 16 डावांत 6 शतके झळकावली होती.

अभिषेक शर्मा

IPL 2024 मध्ये अभिषेक शर्माची कामगिरी तुफानी होती. अभिषेक पहिल्या चेंडूपासून ट्रॅव्हिस हेडसह गोलंदाजांवर हल्ला करायचा. हंगामातील 16 डावांमध्ये त्याने 32 च्या सरासरीने आणि 204 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून सर्वाधिक 42 षटकारही आले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली. झिम्बाब्वे दौऱ्यावरील दुसऱ्या सामन्यात अभिषेकने शतक झळकावले. पण त्या शतकाशिवाय त्याची कारकीर्दही उदासीन राहिली. अभिषेक शर्मा कारकिर्दीतील पहिल्या डावात शून्यावर आला. दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूत 100 धावा केल्या. त्यानंतर त्याने 8 सामन्यांच्या 7 डावात फलंदाजी केली आहे. या काळात अभिषेकला एकदाही २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 16, 15 आणि 4 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेत त्याच्या बॅटमधून 7 आणि 4 धावा झाल्या आहेत. म्हणजेच सलग तीन डावात त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.