Top stars of the 2024 | 2024 मध्ये हे कलाकार ठरले वरचढ; अभिनयाने तोडले सगळे रेकॉर्डस्

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top stars of the 2024 | 2024 मध्ये बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमा आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगली कामगिरी केली. या चित्रपटांसोबत चित्रपटातील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. 2024 मध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करून सगळ्यांची वाहवा मिळवली. आता आपण जाणून घेणार आहोत की, 2024 मध्ये असे कोणते कलाकार आहेत, जे चर्चेत राहिले आहेत.

विक्रांत मेस्सी | Top stars of the 2024

विक्रांत मेस्सीचा 12 th फेल हा चित्रपट 2023 चा अखेरीस रिलीज झाला. परंतु 2024 मध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. चित्रपटगृहामध्ये देखील हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटाने चांगलीच वाहवा मिळवली. या चित्रपटातील विक्रांत मेस्सीचे पात्र सगळ्यांना खूप आवडले. हा चित्रपट IAS मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. विक्रांत मेस्सी याने मनोज कुमार शर्मा यांचे पात्र निभावले होते. चित्रपटात त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास मांडला. त्यामुळे विक्रांत मेस्सी 2024 मध्ये खूप जास्त लोकप्रिय झाला.

तृप्ती डीमरी

2023 मध्ये तृप्ती डिमरी हिच्या ॲनिमल चित्रपटातील तिच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेनंतर तिला नॅशनल क्रश असे संबोधले जाऊ लागले. या चित्रपटांनंतर तिच्यासमोर अनेक प्रोजेक्टच्या रांगा लागलेल्या आहेत. 2024 मध्ये तिने बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशल सोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील चांगलाच गाजला. त्यानंतर बॉलीवूडमधील सर्वात जास्त बहुप्रतिक्षित असणाऱ्या भुलभुलैय्या 3 या चित्रपटात देखील तिने काम केले. या चित्रपटांनंतर आता तृप्ती डिमरी ही बॉलीवूडमधील एक मोस्ट डिमांडेड अभिनेत्री झालेली आहे.

अल्लू अर्जुन

दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचे खूप जास्त चाहते आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावलेले आहे. परंतु पुष्पा 2 हा 2024 मधील त्याचा सगळ्यात मोठा प्रतिक्षित चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मजल मारली. चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून अगदी सगळ्यांच्याच बत्या गुल झालेल्या आहेत. चित्रपटात त्याचे डायलॉग, त्याची ॲक्शन त्याचप्रमाणे त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडलेला आहे. त्यामुळे आलू अर्जुन 2024 मधील सगळ्यात मोठा अभिनेता मानला जातो.

क्रीती सेनन

राष्ट्रीय पुरस्कार विजेलो क्रीती सेनन हिने अनेक प्रकारचे चित्रपट केलेले आहे. परंतु 2024 मध्ये आलेला तेरी बातो मे ऐसा उल्झा जिया या चित्रपटातील तिचे पात्र कौतुकास्पद होते. या चित्रपटातील एका रोबोटची भूमिका निभवलेली होती. चित्रपटातील तिचे डायलॉग त्याचप्रमाणे तिचा अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा अभिनय खूप आवडला. आणि त्यामुळेच क्रिती सेनन 2024 मध्ये चांगलीच चर्चेत राहिली.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण ने 2024 मध्ये कल्की 2898 AD या चित्रपटात एक पौराणिक भूमिका निभावली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट पौराणिक काळातील असल्याने तिचे डायलॉग हे खूपच जास्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे तिचा अभिनय सगळ्यांना आवडला. या चित्रपटानंतर तिने सिंघम अगेनमध्ये देखील लेडी सिंघमचे काम केलेले आहे. त्या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिका अत्यंत वेगळ्या होत्या, तरी देखील तिने या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत.