Top verdicts of the year 2024 | 2024 मध्ये अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि घडामोडी घडलेल्या आहेत. ज्याचा परिणाम केवळ राजकारणावरच नाही तर सर्व सामान्य माणसांवर हे मोठ्या प्रमाणात झाला आहे. यातील सगळ्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला दिले. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी १९९९ ला केली होती. मात्र त्यांच्या हयातीत हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव दिले आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पवारांना देण्यात आलं…
निवडणूक आयोगाने या दोन पक्षांबाबत दिलेला निर्णय अत्यंत धक्कादायक होता. त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला देण्यात आलेल्या निवडणूक आयोगाने दिली. जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्यासह आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. याआधी देखील शिवसेना पक्षाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्यानंतर अजित पवार गटाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि त्यांचे चिन्ह घड्याळ असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिले.
त्यानंतर शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह प्रस्ताव करावा लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. निवडणूक आयोगाने याबाबत निकाल जाहीर केला. त्यावेळी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजर होते. निवडणूक आयोगाने या शिवसेनेच्या पक्षाबाबत एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. यामुळे हा निकाल लागला असावा, असे त्यांनी अनेकांना वाटले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत असे होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. परंतु सगळ्यांचा हा अंदाज चुकला आणि निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला. हा निकाल 2024 मधील अत्यंत धक्कादायक निकाल होता या निकालाने केवळ राजकीय पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली नाही, तर सर्वसामान्य लोकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली.