हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. निसर्गाच्या कानाकोपऱ्यात जाऊन घेतला आनंद घेऊन घेण्यात एक वेगळीच मजा आहे. अनेक लोक फिरायला जाताना महाराष्ट्र बाहेर किंवा देशाबाहेर देखील जातात. परंतु आपल्या महाराष्ट्रात देखील अशी अनेक ठिकाण आहेत. तिथे जाऊन तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्रातील अशी अनेक ठिकाण आहेत, याबद्दल लोकांना अजूनही माहित नाही.
इतर राज्यातील अनेक लोकही महाराष्ट्रात फिरण्यासाठी येतात. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून अक्षरशः लोकांचे मन हरपून जाते. महाराष्ट्रात छोट्या छोट्या शहरांमध्ये अनेक लपलेली सुंदर ठिकाण आहेत. अत्यंत शांत आणि बजेट फ्रेंडली ही ठिकाणे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच महाराष्ट्रातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही या हिवाळ्यात नक्कीच फिरायला जाऊ शकता.
तोरणमाळ हिल स्टेशन
ज्या लोकांना ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करायला आवडते. त्यांच्यासाठी हे हिल स्टेशन खूप महत्त्वाची हिल स्टेशन आहे. तुम्ही सीताखाई ट्रेक करू शकता. तसेच मच्छिंद्रनाथ महाराजांची गुहा देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ही गुहा निसर्गात आहे. ही गुहा मच्छिंद्रनाथांचे ध्यान स्थान मानले जाते. हे महाराज महान तपस्वी होते. त्यांना माशांचा स्वामी म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेक लोक फिरायला जात असतात.
यशवंतराव तलाव आणि लोटस तलाव
तोरणमाळ हिल स्टेशनचे सर्वात जास्त आकर्षण म्हणजे यशवंतला तलाव आणि लोटस तलाव. हे तलाव पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या ठिकाणी अनेक कमळाची फुले तुम्हाला पाहायला मिळतात. या हिल स्टेशनवर अनेक हिरवीगार झाडे देखील आहे. आणि जंगलांनी वेढलेल्या आहेत निसर्ग प्रेमींना हे ठिकाण खूप आवडते.
या ठिकाणी कसे जायचे
तोरण माहे मुंबईपासून सुमारे 465 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. नंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावरून तुम्ही बस किंवा कॅबने तोरणमाळ हिल स्टेशन पर्यंत जाऊ शकता. या ठिकाणी अनेक बसेसची सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या आहेत. तुम्ही ट्रेनने 600 ते 700 रुपयात या ठिकाणी पोहोचू शकता. तसेच टोल पेट्रोल या सगळ्याचा खर्च मिळून तुम्ही 200 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता