राज्यात आज ८ हजार ३०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २५८ रुग्णांचा मृत्यू

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली. राज्यात ८ हजार ३०८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५४.८१ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.९१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात समोर आलेल्या संख्येनुसार आज १ लाख २० हजार ४८० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ३०८ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही २ लाख ९२ हजार ५८९ इतकी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here