Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात (Tour Packages) तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे . भारतीय रेल्वे अगदी कमी खर्चात आणि सर्व सुविधांसह एक खास पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 50 हजार रुपयांत थायलंड आणि बैंकॉकला जाऊ शकता. या पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोयसुद्धा करण्यात आली आहे.

Tour Packages

काय आहे IRCTC चे पॅकेज- Tour Packages

IRCTC ने नवीन वर्षाच्या निमित्त 5 रात्री आणि 6 दिवसांचे पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंड, बँकॉक आणि पट्टायाला जाऊ शकता. या ठिकाणांना तुम्ही एकटे किंवा कुटुंबासह भेट देऊ शकता. 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2023 च्या कालावधीत ही tour आहे. कोलकात्यापासून या सफारीला सुरुवात होणार आहे. म्हणजेच कोलकाता ते थायलंड असा प्रवास तुम्हाला करता येणार आहे. या प्रवासाला सुरुवात झाल्यांनतर सर्वप्रथम ही tour कोलकाताहुन सर्वप्रथम बँकॉकला जातील., त्यानंतर तेथून तुम्हाला पट्टायाला नेले जाईल.

Tour Packages

IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याचा (Tour Packages) आणि खाण्यापिण्याचा सुद्धा समावेश आहे. मात्र इतर कोणत्याही अतिरिक्त खर्चासाठी मात्र तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. राहण्यासाठी हॉटेलची सोय करण्यात येईल तसेच तेथून आजूबाजूला फिरण्यासाठी गाड्यांची सोय सुद्धा याच पॅकेजमध्ये करण्यात आली आहे.

Tour Packages

IRCTC वेबसाइटनुसार, थायलंडला जाण्यासाठी (Tour Packages) या पॅकेजची किंमत एका प्रवाशासाठी 54,350 रुपये आणि डबल यात्रीसाठी 46,100 रुपये असेल. याशिवाय, या पॅकेजच्या माध्यमातून 3 व्यक्ती प्रवास करत असतील तरी सुद्धा प्रति व्यक्ती 46100 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला सुद्धा थायलंडला जाण्याची इच्छा असेल तर IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.