Tourism And Hospitality : देशभरातून अनेकदा बेरोजगारीचं सूर उमटताना दिसतात. मात्र हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्र हे असे क्षेत्र आहे ज्यामुळे चांगली रोजगार निर्मिती होऊ शकते (Tourism And Hospitality) अशी आशा हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या 5 ते 7 वर्षांत 5 कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. सरकारने पाठिंबा दिल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येईल, असे हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एचएआय) सोमवारी सांगितले. त्यासाठी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा (Tourism And Hospitality) दर्जा देण्याची गरज आहे. हा पाठिंबा मिळाल्यास या क्षेत्रात करोडो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा आवश्यक (Tourism And Hospitality)
HAI अध्यक्ष पुनीत छथवाल यांनी सहाव्या HAI हॉटेलियर्स कॉन्क्लेव्हमध्ये सांगितले की, हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा मिळण्याबरोबरच राहण्याची व्यवस्था, उत्पन्न आणि रोजगारही (Tourism And Hospitality) वाढेल. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ छठवाल म्हणाले की, पर्यटन हा विकासाचा आधारस्तंभ आहे. देशातील एकूण रोजगारामध्ये ते 10 टक्के योगदान देत आहे. याशिवाय, त्याचा जीडीपीमध्ये 8 टक्के वाटा आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्राला फक्त योग्य धोरणांची गरज आहे.
2 वर्षात 271 टक्क्यांनी वाढली नोकरभरती
रॅडिसन हॉटेल ग्रुपचे चेअरमन एमेरिटस आणि एचएआयचे उपाध्यक्ष केबी काचरू म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत नोकरभरतीत 271 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यात 5 कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट गाठता येईल. यावरून व्यवसायाची (Tourism And Hospitality) प्रगती झपाट्याने होत असल्याचे स्पष्ट होते. हे क्षेत्र आपली क्षमता सरकारपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरते आहे असे ते म्हणाले.
यापूर्वी, अमिताभ कांत यांनी या क्षेत्रातील कंपन्यांना उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.पर्यटन उद्योग मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करत असल्याचे राजकारण्यांना (Tourism And Hospitality) सांगण्यास आतापर्यंत अपयशी ठरला आहे. ते म्हणाले की, थायलंडने सुमारे 2 कोटी, मलेशियाने 1.5 कोटी आणि भारतात 78 लाख रोजगार पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण केले आहेत. असे ते म्हणाले.