गुलाबी थंडीत फिरायचंय? सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कडाक्याची थंडी काय असते याचा अनुभव सध्या सर्वजण घेत आहेत. पहाटेच्या वेळी या ‘थंडा’ईचा अनुभव घेणं एकदम मस्त-रिफ्रेशिंग असे असते. सध्या जवळपास अशीही काही ठिकाणं आहेत जिथं तुम्हाला बोचरी, गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते. मात्र त्यासाठी वीकेण्डला झोप बाजूला ठेवायची, भटकंतीचा एखादा स्पॉट निवडायचा आणि निघायचं… सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कायम गुलाबी थंडी अनुभवयाला मिळते. सध्या येथील अनेक ठिकाणे हे पर्यटकांनी गजबजले आहेत.

महाबळेश्वरात सध्या दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, त्यातून वाहणारा थंडगार अवखळ वारा, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी अशा स्वगीर्य वातावरणाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटात वसलेले हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. महाबळेश्वर हे पर्यटकांच्या पसंतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते.

दरवर्षी लाखो देशीविदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पर्यटकांचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यात असतो मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांत देखील येथे गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेतात. याहीवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती.

सध्या मिनी काश्मीर म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर थंडगार वातावरणामुळे बहरण्यास सुरु झाले आहे. दिवाळीच्या सुट्या संपू लागल्या असल्या तरीही पर्यटकांची या ठिकाणी गर्दी कायम आहे. थंडीच्या अनुभव घेत अनेक पर्यटक वेण्णा लेकवर नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागली असल्याने महाबळेश्वरमध्ये गर्दी वाढू लागली आहे.

Venna Lake Mahabaleshwar

 

वेण्णा लेकवरील नौका विहार

महाबळेश्वरमध्ये मुख्य आकर्षणाचे ठिकाण व नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक येथे पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची अनुभूती घ्यायचा असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी.

strawberries

बाजारपेठेची वेगळी ओळख

महाबळेश्वरमध्ये आल्यास या ठिकाणी प्रथम मोठी अशी बाजारपेठ लागते. या बाजारपेठेची चांगलीच वेगळी ओळख आहे. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल खरेदीबरोबरच स्ट्रॉबेरी, जाम, जेली, चॉकलेट, ट्रॉबेरी फळासह अनेक फळे त्याचप्रमाणे थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शाल, मफलर, कानटोपी अशी उबदार वस्त्रे या ठिकाणी मिळतात. सध्या या ठिकाणी पर्यटनास येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

महाबळेश्वरमध्ये कोणती आहेत पर्यटनस्थळे?

महाबळेश्वरात अनेक प्रसिद्ध अशी पर्यटनस्थळे आहेत कि ज्या ठिकाणी फिरता येते. येथे वेण्णा लेक, केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, लॉडवीक पॉईंट, सनसेट पॉईंट, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेला लिंगमळा धबधबा या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

बस सेवा उपलब्ध

सातारा जिल्ह्याच्या ठिकाणाहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मेढा घाटमार्गे केळघर महाबळेश्वर तसेच वाई पाचगणी महाबळेश्वर असा एक मार्ग आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTC च्या बस, खाजगी बस, खाजगी वाहने सतत उपलब्ध असतात.