हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हायब्रीड कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या नव्याने लॉन्च केलेल्या 7 सीटर इनोव्हा हायक्रॉसच्या काही व्हेरियेण्टचे बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हायब्रीड इंजिन आणि दमदार लुक असलेल्या या कारला ग्राहकांची मोठी पसंती पाहायला मिळाली होती. मात्र पुरवठा साखळीतील अडचणींमुळे इनोव्हा हायक्रॉस – ZX आणि ZX (O) च्या टॉप एंड व्हेरियंटसाठी बुकिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इनोव्हा हायक्रॉस अलीकडेच नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती . सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेरियंट [SHEV] तसेच गॅसोलीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या इनोव्हा हायक्रॉसला प्रगत टेक्नॉलॉजी, सुसज्ज वापरासाठी आणि तिच्या सुरक्षितता वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी आम्ही आमच्या मूल्यवान ग्राहकांचे आभारी आहोत. परंतु पुरवठ्याच्या अडचणीमुळे 8 एप्रिल 2023 पासून इनोव्हा हायक्रॉसच्या ZX आणि ZX (O) या व्हेरिएन्टसाठीचे बुकिंग तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. कंपनीने इनोव्हा हायक्रॉसच्या हायब्रीड मॉडेल्सचे बुकिंग तात्पुरते बंद केले असले तरी दुसरीकडे, इनोव्हा हायक्रॉसच्या उर्वरित व्हेरियंटचे बुकिंग आणि डिलिव्हरी मात्र सुरूच राहणार आहे.
काय आहे खास –
इनोव्हा हायक्रॉसला 2.0-लिटर पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 150bhp आणि 187Nm टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन हायब्रिड मोटरसह देखील उपलब्ध करून दिले आहे, जे 111bhp आणि 206Nm टॉर्क जनरेट करते. इनोव्हा हायक्रॉस हायब्रिडचे मायलेज 23.4 kmpl आहे. गाडीच्या आरामदायी सीटमुळे प्रवास करताना कंफर्ट वाटत. गाडीतील हवेशीर फ्रंट सीटमुळे कितीही उन्हाळा असला तरी चिंता करण्याचे कारण नाही . गाडीमधील अनोखी फ्लॅट फ्लोर डिझाइन, 285 सेमीचा व्हीलबेस यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र प्रवास करण्यासाठी अधिक जागा मिळते.
फीचर्स –
नोव्हा हायक्रॉस ZX आणि ZX (O) च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये ADAS, एलईडी लाइटिंग, पॅनोरमिक सनरूफ, पॉवर टेलगेट, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, व्हेंटिलेटेड सीट, टू-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, 6 एअरबॅग यांसारखे फीचर्स मिळतात. गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची एक्स-शोरूम किंमत 18.55 लाख ते 29.72 लाख रुपये आहे.