Toyota Rumion: भारतीय बाजारपेठेमध्ये पुढील महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी टोयोटा आपली नवीन MPV कार टोयोटा रुमिओन लाँच करणार आहे. या 7-सीटर कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह जास्त स्पेस मिळणार आहे. ही कर सप्टेंबर महिन्यात विक्रीसाठी लॉन्च केली जाणार आहे. चला मग जाणून घेऊया टोयोटाच्या या नवीन 7-सीटर कारबद्दल संपूर्ण माहिती.
Autocar च्या रिपोर्टनुसार, Toyota आपली नवीन MPV Rumion बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. टोयोटा आधीच दक्षिण आफ्रिकेसारख्या जागतिक बाजारपेठेत रुमिओनची विक्री करते. ज्याचा पुरवठा मारुती सुझुकीने केला आहे, आता तो भारतीय बाजारपेठेतही लॉन्च करण्याची योजना आहे. हे जागतिक बाजारपेठेतील सर्वोत्तम कौटुंबिक एमपीव्ही मानली जाते.
टोयोटा रुमिओन जागतिक बाजारपेठेत उपलब्ध –
टोयोटा रुमिओन लाँच केल्यानंतर भारतीय बाजारात टोयोटाची ही चौथी MPV असेल. आत्तापर्यंत कंपनी इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर सारखी मॉडेल्स विकते. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत ही MPV सादर केली आणि त्याच वेळी ही नेमप्लेट भारतातही ट्रेडमार्क केली. टोयोटाची ही सर्वात स्वस्त एमपीव्ही असेल.
टोयोटा रुमिओन कसे असेल –
Maruti Suzuki Ertiga पेक्षा बेस्ट या MPV मध्ये, कंपनी मोठे बदल करून त्याचा लुक आणि डिझाइन वेगळे करू शकते. जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेले मॉडेल बहुतांशी Ertiga सारखेच असले तरी ते येथील बाजारपेठेत नव्या रूपात सादर केले जाईल. जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणार्या मॉडेलला सर्व काळ्या इंटीरियर्स मिळतात तर इथल्या Ertiga ला बेज रंगाचे इंटीरियर मिळतात. हेच केबिन Rumion मध्ये देखील दिसू शकते.
या कारमध्ये 1.5-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले जाईल, जे 103hp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे शक्य आहे की, नंतर टोयोटा ही कार सीएनजी प्रकारात सादर करेल, सध्या ती फक्त पेट्रोल इंजिनसह बाजारात लॉन्च केली जाईल. आता टोयोटा या कारची किंमत काय ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.