Tractor Insurance | ट्रॅक्टर विमा घेणे का आहे महत्वाचा ? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tractor Insurance | आजकाल अनेक शेतकरी हे आधुनिक शेतीचा अवलंब करतात. शेतीसाठी आता यांत्रिकीकरण देखील उदयास आलेले आहे. त्यामुळे शेतात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे एक मोठे वरदान आहे. शेती करताना ट्रॅक्टर अत्यंत महत्त्वाचे असे साधन आहे. शेतात पेरणी, खुरपणी, काढणी, वाहतूक करणे अशा अनेक कामांसाठी ट्रॅक्टर (Tractor Insurance) लागतो. त्यामुळे अनेक लोक हे ट्रॅक्टरची खरेदी करत असतात.

परंतु लाखो रुपये खर्च करून घेतलेला हा ट्रॅक्टर कधी कधी नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरीमुळे शतिग्रस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते. परंतु या नुकसानापासून वाचण्यासाठी तुम्ही ट्रॅक्टरचा विमा (Tractor Insurance) घेणे खूप गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल की, आजपर्यंत आपण पीक विमा, अपघात विमा ऐकला होता. परंतु हा ट्रॅक्टर विमा नक्की काय आहे? तर याबद्दलच आपणास सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ट्रॅक्टर विमा काय आहे?

ट्रॅक्टर विमा हा एक करार आहे. या करारामध्ये विमाधारक विमा कंपनीला विमा प्रीमियम भरण्यास सहमत होतो. आणि विमा कंपनी अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळे ट्रॅक्टरला काही नुकसान झाले, तर त्याची भरपाई देण्यास देखील मदत करते. आता हा ट्रॅक्टर विमा घेण्याने काय फायदे होतात हे आपण पाहूया.

ट्रॅक्टर विमा घेण्याचे फायदे | Tractor Insurance

आर्थिक सुरक्षा

ट्रॅक्टरची जर चोरी झाली, नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाले, तर तुम्हाला ट्रॅक्टर विम्याद्वारे पैसे मिळतात आणि तुमचे आर्थिक नुकसान होत नाही.

कानूनी बंधन

भारतातील मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक ट्रॅक्टरसाठी विमा घेणे बंधनकारक आहे.

दुरुस्तीसाठी मदत

तुमच्या ट्रॅक्टरमध्ये जर काही बिघाड झाली, तर त्या दुरुस्तीसाठी देखील खूप पैसे लागतात. अशा वेळी विमा कंपनी ट्रॅक्टरचे दुरुस्ती खर्चासाठी आर्थिक सहाय्य करते.

आर्थिक संरक्षण

आपण जर विमा घेतल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरची सुरक्षा राहते. त्यामुळे ट्रॅक्टरला काही झाले तरी आपल्याला जास्त काळजी राहत नाही.

ट्रॅक्टर विमा निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या

विमा प्रकार

थर्ड पार्टी -विमा आणि सर्वसमावेशक विमान असे या ट्रॅक्टर विम्याचे दोन पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही थर्ड पार्टी विमा तृतीय पक्षाला झालेले नुकसानीसाठी देतो तर सर्वसमावेशक विमा ट्रॅक्टर आणि तृतीय पक्ष या दोघांनाही भरपाई देतो त्यामुळे हा विमा निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडा.

विमा कंपनी

विमा कंपनी निवडताना कंपनीची विश्वासहार्यता ग्राहक सेवा आणि विम्याचा मिळणारा लाभ या सगळ्या गोष्टींचा विचार करा.

विमा कवर | Tractor Insurance

विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या विम्या कव्हरचा काळजीपूर्वक अभ्यास करा.

ट्रॅक्टर विमा कसा मिळवायचा ?

तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने विभाग कंपनीच्या वेबसाईटवरून ट्रॅक्टर विमा मिळू शकता. विमा अर्ज करताना तुम्हाला ट्रॅक्टरचे नोंदणी तपशील मालकीचा पुरावा चालकाचा परवाना इत्यादी सगळी कागदपत्रे सादर करावी लागतील.