Tractor Yojana | आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारतातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले केंद्र सरकार देखील देशातील कितीतरी करोडो शेतकऱ्यांना मदत व्हावी. त्यांचे उत्पादन चांगले व्हावे, त्याचप्रमाणे त्यांचे शारीरिक कष्ट कमी व्हावे. यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. आणि काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते. याचा फायदा शेतकऱ्यांना वेळोवेळी होतच असतो.
आज काल केंद्र सरकारने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे अनेक मार्ग शेतकऱ्यांपुढे खुले केलेले आहे. आणि त्यासाठी सरकार अनुदान देखील देत आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्याची देखील आता चर्चा चालू आहे. यामध्ये गरीब शेतकऱ्यांना मदत सरकार करणार आहे. आणि बऱ्याच मागील दिवसांपासून ट्रॅक्टर योजनेबाबत माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपूर अनुदान देणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपण पाहूया
सोशल मीडियावर काय दावा केला
सोशल मीडियावर व्हायरल झालेले या बातम्यांमध्ये असे सांगितले जाते की, केंद्र सरकारकडून पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे. तसेच गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना केंद्र सरकारने राज्यसरकार यांच्याकडून मिळून 50 टक्के अनुदान मिळणार आहे. आणि हे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
या योजनेचे सत्य काय ? Tractor Yojana
आता हाती आलेल्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. देशभरातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रेस कॉन्फरन्स ब्युरोद्वारे आधीच एक चेतावणी केली होती. यामध्ये असे सांगण्यात आली होती की, अशी कोणतीही सबसिडी योजना सरकार द्वारे चालवली जात नाही. पीएम ट्रॅक्टर योजनेसंबंधी अशा बातम्या पूर्णपणे खोटे आहेत. त्याचप्रमाणे अशा कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना क्लिक न करण्याच्या देखील सूचना दिलेल्या जात आहेत.
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. परंतु ट्रॅक्टरवर 50% अनुदानाची योजना अजूनही सरकारने चालू केलेली नाही. परंतु काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. परंतु महाराष्ट्रात अजून ही योजना सुरू झालेली नाही. त्याशिवाय ट्रॅक्टर कोणत्याही खरेदीसाठी कर्ज सहज उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्त व्याज दारात देखील कर्ज दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होतो. परंतु 50 टक्के अनुदानाची योजना पूर्णपणे खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.