व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महामार्गावर वाहतूक पोलिसांची हफ्तावसुली, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी (traffic police demanding bribe) काही महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उस्मानाबाद-लातूर रोडवर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता (traffic police demanding bribe) मागताना दिसत आहे. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय घडले नेमके ?
बार्शी तालुक्यातील अस्लम जानूर शेख आपल्या वाहनात शेळ्या घेऊन लातूरकडे चालला होता. उस्मानाबाद – लातूर हद्दीवर पोलिसांनी त्याची गाडी अडवली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. खटला दाखल केला तर चार हजार दंड होईल. प्रत्येक शेळीचे 10 रुपये पैसे दे, अशी मागणी (traffic police demanding bribe) त्याच्यावर केली.

हे पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर या पुढे रिकाम्या गाडीचे 50 तर भरलेल्या गाडीचे 100 रुपये लागतील, असे सुद्धा त्यांनी (traffic police demanding bribe) वाहनचालकाला सांगितले. हा सगळा धक्कादायक प्रकार वाहन चालकाने आपल्या कॅमेऱ्यात (traffic police demanding bribe) कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी संबंधित पोलिसावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय